राष्ट्रवादीचा भाजपला मोठा झटका; माजी महापौरांसह 22 नगरसेवकांच्या हाती ‘घड्याळ’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उल्हासनगरमध्ये राजकीय घडामोडीत वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मोठा झटका दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगर महापालिकेतील 22 नगरसेवकांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहेत. त्याआधी कलानी यांची सून पंचम कलानी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.

ADVERTISEMENT

नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने उल्हासनगर शहरात आलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ‘कलानी महल’ येथे पप्पू कलानी याची भेट घेतल्यानंतर मोठी माहिती समोर आली होती.

माजी आमदार ज्योती कलानी यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलानी कुटुंबात कुणीही नव्हते. त्यामुळे भाजपपासून दुरावलेल्या ओमी कलानी आणि पप्पू कलानींना राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही असल्याचे दिसत होते.

हे वाचलं का?

पंधरा दिवसांपूर्वी भाजपाचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्याशी पप्पू कलानींनी चर्चा केली होती. त्यामुळे आता भाजपला कलानी गटाने मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीनंतर ओमी कलानी गटाचे 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, आणखी 10 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असा दावा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. उल्हासनगर महापालिकेत भाजपचे एकूण ४० नगरसेवक होते, त्यापैकी ओमी कलानी गटाच्या 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील प्रवेशानंतर त्यांच्यावर कोणतीही अपात्रतेची कारवाई देखील होणार नसून, भाजपला या नगरसेवकांना व्हिप देखील जारी करता येणार नाही.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उल्हासनगर शहरातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले कलानी कुटुंबीय यांचे घनिष्ठ संबंध आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेल्या ज्योती कलानी यांना अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच उमेदवारी दिली होती. काही दिवसांपूर्वी ज्योती कलानी यांचे निधन झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलानी कुटुंबात सध्याच्या घडीला कुणीही नव्हते. मात्र आता उल्हासनगर पालिकेतील कलानी गटाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने चित्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT