सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर 30 मार्चला होणार सुनावणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई तकः ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी आरोप झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ठाणे सेशन्स कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्या प्रकरणावर आता 30 मार्चला सुनावणी होणार आहे. वाझे यांच्या एनआयए कस्टडीची मुदत 25 मार्चला संपतेय.

ADVERTISEMENT

वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर एटीएसने देखील त्यांचं म्हणणं ठाणे सेशन्स कोर्टाला सादर केलं आहे. वाझेंच्या वतीने त्यावर उत्तर देण्यासाठी वाझेंच्या वकील आरती कालेकर यांनी कोर्टाकडे मुदत मागितली होती. कोर्टाने वाझेंच्या वकीलाला 30 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. माध्यमांशी बोलताना कालेकर यांनी याबाबत माहिती दिली. तसंच एटीएसने याबाबत कोर्टात सादर केलेलं उत्तर वाचण्यासाठी त्यंना वेळ लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी आरोप झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. दहशतवाद विरोधी पथक अर्थात ATS नेही सचिन वाझे यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पुढील कारवाईची शक्यता लक्षात घेऊन सचिन वाझे यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता. वाझे यांची कस्टडी 25 मार्च रोजी संपतेय.

हे वाचलं का?

मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाच्या बाहेर एक स्कॉर्पिओ २६ फेब्रुवारीला आढळली होती. या स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. मनसुख हिरेन यांची आणि सचिन वाझे यांची ओळख होती. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत आढळला. त्यानंतर या प्रकरणात सचिन वाझेंवर गंभीर आरोप झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सचिन वाझे यांनी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT