Transformation Journey: लठ्ठ झाल्याने नातेवाईक करायचे मस्करी, महिलेने दाखवलं 30 किलो वजन कमी करुन!
एक गृहिणी आणि 3 वर्षांच्या मुलाच्या आईने फक्त घरगुती व्यायाम आणि चालणं एवढाचा व्यायाम करून तब्बल 30 किलो वजन कमी केलं आहे. 30 किलो वजन कमी करण्यासाठी तिला फक्त 7 महिने लागले. वजन कमी करण्यासाठी तिचा आहार आणि नेमका व्यायाम कसा होता याबद्दल जाणून घेऊयात सविस्तरपणे. पण हा Fat to Fit चा सगळा प्रवास नेमका […]
ADVERTISEMENT
एक गृहिणी आणि 3 वर्षांच्या मुलाच्या आईने फक्त घरगुती व्यायाम आणि चालणं एवढाचा व्यायाम करून तब्बल 30 किलो वजन कमी केलं आहे. 30 किलो वजन कमी करण्यासाठी तिला फक्त 7 महिने लागले. वजन कमी करण्यासाठी तिचा आहार आणि नेमका व्यायाम कसा होता याबद्दल जाणून घेऊयात सविस्तरपणे. पण हा Fat to Fit चा सगळा प्रवास नेमका कसा सुरु झाला याचीही एक वेगळी कहाणी या सगळ्यामागे आहे. ती देखील आपण जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
वजन वाढण्याची मुख्य कारणे म्हणजे अति खाणे Overeating), तेलकट खाद्यपदार्थ (Oily food), सुस्त जीवनशैली (Sedentary lifestyle), झोप न लागणे (Lack of sleep) जंक फूड (Junk food in snacks) इत्यादी आहेत.
भारतीयांबद्दल बोलायचे झाले तर जोपर्यंत त्यांचे वजन प्रचंड वाढत नाही तोपर्यंत ते अनफिट आहेत असं समजतच नाही. जोपर्यंत पोट बाहेर येत नाही, थकवा येत नाही, दम लागत नाही, तोपर्यंत त्यांना असं वाटतं की, आपलं फक्त थोडंच वजन वाढलं आहे आणि ते आपोआपच कमी होईल असे आपण मानतो.
हे वाचलं का?
पण वजन आपोआप कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाली (Physical activity) वाढवाव्या लागतात, चांगला आहार घ्यावा लागतो (Clean diet) तसेच पुरेशी झोप देखील आवश्यक आहे.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका आईची गोष्ट सांगणार आहोत, जिने आपले तब्बल 30 किलो वजन कमी केले आहे. या सगळ्या त्यांनी आपल्या मुलाची देखभाल तर केलीच पण स्वत:ला देखील फिट ठेवलं. Aajtak.in शी बोलताना त्यांनी आपला फिटनेस प्रवास शेअर केला. ज्यामुळे वजन कमी करणाऱ्या अनेक महिलांना आणि इतरांना प्रेरणा मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
-
नाव: ज्योती थोरवे
वय: 30 वर्षे
नोकरी : गृहिणी
शहर: एबरडीन, युनायटेड किंगडम
लांबी: 5 फूट 4 इंच, 162 सेमी
आधीचे वजन: 90 किलो
सध्याचे वजन: 60 किलो
एकूण कमी केलेले वजन : 30 किलो
कमाल BMI: 34.35
90 ते 60 किलोपर्यंतचा फिटनेस प्रवास (Fitness journey from 90 to 60 kg)
Aajtak.in शी बोलताना ज्योतीने सांगितले की, ‘2018 मध्ये गर्भधारणेनंतर माझे वजन वाढू लागले. स्वतःकडे लक्ष न दिल्याने हळूहळू माझे वजन 90 किलो होत गेले आणि 2018 ते 2021 पर्यंत म्हणजे 3 वर्षात माझे वजन कमी झालेच नाही. मूल लहान असल्याने त्याच्या संगोपनात वजन कमी करण्याचा फारसा मी विचार केला नाही. पण त्यानंतर जेव्हा मी नातेवाईक आणि मित्रांना भेटले तेव्हा सर्वांनी माझ्या वाढलेल्या वजनाची खिल्ली उडवली.’
‘त्यादिवशीच मी मनात ठरवले होते की, आता मला वजन कमी करायचे आहे. यानंतर ती 2021 मध्ये पतीसोबत यूकेला गेली. मी तिथे पाहिलं की, तिथले लोक खूपच फिट आहेत आणि ते हायकिंग, पर्वतांमध्ये सायकलिंग, सर्फिंग यासारख्या अनेक गोष्टी करतात. या गोष्टी खरं तर माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होत्या, कारण मलाही हे सर्व करायचं होतं, पण माझ्या वाढलेल्या वजनामुळे मी ते करू शकले नाही.’
‘मात्र मी वजन कमी करण्याचा निर्धार केला आणि 2021 पासून आहारावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली. हळूहळू माझे वजन कमी होत गेले आणि गेल्या 7-8 महिन्यांत माझे 30 किलो वजन कमी झाले. मी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली होती की, मी जे ध्येय ठेवलं होतं म्हणजेच स्वत:ला तंदुरुस्त करून मगच हा प्रवास संपवायचा.’
हे डाएट फॉलो करायची ज्योती
ज्योती सांगते की, तिने आहार अगदी सोपा ठेवला होता, जो ती दीर्घकाळ पाळू शकते. ती संध्याकाळी 6 च्या आधी जेवण करायची आणि त्यानंतर ती थोडे चालत असे. सकाळी उठल्यावर सर्वात आधी ती रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि आले मिसळून ते पाणी प्यायची. तसंच संध्याकाळी देखील असंच करायची.
याशिवाय, ती दिवसातून 3 वेळा जेवण घेत असे, ज्यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण होते. तिन्ही जेवणातील कॅलरी एकत्र करून ती सुमारे 1700 कॅलरीज घेत असे, जे खालीलप्रमाणे आहे.
ब्रेकफास्ट (Breakfast)(सुमारे 400 कॅलरी)
-
बदाम आणि काजू
-
प्रोटीन शेक
दुपारचे जेवण (Lunch) (सुमारे 800 कॅलरीज)
-
2 चपात्या किंवा 1 बाजरीची भाकरी
-
2 कप डाळ किंवा 1 कप भाजी
-
हिरवं सॅलेड
-
1 ग्लास ताक
रात्रीचे जेवण (Dinner)(सुमारे 500 कॅलरीज)
-
कोशिंबीर+सोया चाप
-
किंवा
-
सॅलडसह प्रोटीन शेक
याशिवाय ती आठवड्यातून 1 दिवस चीट डे ठेवायची आणि त्या दिवशी तिच्या आवडीची प्रत्येक डिश खायची.
ज्योती सांगते की, तिने कधीही जिममध्ये व्यायाम केला नाही. ती एकतर घरी व्यायाम करायची किंवा बाहेर फिरायला जायची. ती 6 किमी/तास वेगाने दररोज 7 किमी चालत असे. ज्याने सुमारे 700 कॅलरीज बर्न केल्या. यानंतर, ती 30 मिनिटे घरी सामान्य व्यायाम करत असे, ज्यामध्ये सिटप्स (Sitps), क्रंच (Crunches), प्लँक (Plank), पुश अप्स (Push ups) समाविष्ट होते. प्रत्येक व्यायामाचे 5 सेट ती करायची.
काही दिवसांनी तिने आपले चालण्याचे अंतर वाढवले आणि मग ती रोज 10 किलोमीटर चालायला लागली. ज्यामध्ये सकाळी 5 किलोमीटर आणि संध्याकाळी 5 किलोमीटर ती चालत असे. त्यामुळे तिला वजन कमी करण्यास मदत झाली.
हळूहळू वजन कमी करा
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील ‘बबीता जी’ने घटवलं वजन, पाहा तिचा सॉलिड लूक
‘वजन कमी करण्यासाठी सातत्य खूप आवश्यक आहे त्यानंतरच हळूहळू वजन कमी होऊ लागते. जर मी काही दिवस आहार आणि कसरत सोडली असती तर माझे वजन पुन्हा वाढले असते. परंतु मी सातत्य राखले आणि हळूहळू 30 किलो वजन कमी केले.’ असंही ज्योती म्हणाली.
वजन कमी केल्यानंतर बरेच लोक ते टिकवून ठेवू शकत नाहीत. याचे कारण म्हणजे वजन कमी केल्यानंतर ते पुन्हा जास्त खाणं सुरू करतात आणि त्यांची जीवनशैली पुन्हा एकदा बदलते. त्यामुळे त्यांचं वजन वाढत जातं.
जर एखाद्याला वजन कमी करायचे असेल तर त्याने बाहेरच्या अॅक्टिव्हिटीमध्ये गुंतले पाहिजे. व्यायामासाठी जिममध्ये जा, असे मी म्हणत नाही. त्यापेक्षा माझ्याप्रमाणे तुम्ही घरी राहूनही व्यायाम करू शकता. याशिवाय प्रथिनेयुक्त अन्न खा आणि जंक फूड, शर्करायुक्त अन्न इत्यादी खाणे बंद करा. असा अगदी साधा सोप्पा उपाय ज्योतीने वजन कमी करणाऱ्यांना सांगितला आहे.
वजन कमी करण्याचा ज्योतीचा हा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. मात्र, इच्छाशक्ती आणि सातत्य यामुळे ज्योतीने आपलं वजन तर घटवलंच पण वजन कमी करु इच्छिणाऱ्यांसमोर एक आदर्शही निर्माण केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT