महाराष्ट्रात दिवसभरात 31 हजारांपेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 93 टक्क्यांच्याही पुढे
महाराष्ट्रात दिवसभरात 31 हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 53 लाख 7 हजार 874 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 93.24 टक्के इतका झाला आहे. दिवसभरात 20 हजार 470 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. दिवसभरात 424 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातला मृत्यू दर हा आता […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 31 हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 53 लाख 7 हजार 874 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 93.24 टक्के इतका झाला आहे. दिवसभरात 20 हजार 470 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. दिवसभरात 424 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातला मृत्यू दर हा आता 1.64 टक्के इतका आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 43 लाख 50 हजार 186 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56 लाख 92 हजार 920 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला राज्यात 21 लाख 54 हजार 976 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 16 हजार 78 रूग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. तर आज घडीला राज्यात 2 लाख 88 हजार 88 सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
Fact Check: कोरोना Vaccine घेतल्यानंतर 2 वर्षाच्या आत मृत्यू? जाणून घ्या ‘या’ व्हायरल स्टोरी मागचं नेमकं सत्य
हे वाचलं का?
महाराष्ट्रात आज घडीला 2 लाख 89 हजार 88 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 20,740 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 56,92,920 झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण 424 मृत्यूंपैकी 291 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 133 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 549 ने वाढली आहे. हे 549 मृत्यू, पुणे- 96, औरंगाबाद- 54, सातारा- 53, सोलापूर- 42, भंडारा- 39, अहमदनगर- 35, वर्धा- 32, रत्नागिरी- 28, लातूर- 23, यवतमाळ- 18, उस्मानाबाद- 14, पालघर- 14, नाशिक- 13, नांदेड- 12, सांगली- 11, कोल्हापूर- 10, रायगड- 10, ठाणे- 10, वाशिम- 9, नागपूर- 8, जळगाव- 4, बुलढाणा- 3, नंदूरबार- 3, चंद्रपूर- 2, परभणी- 2, सिंधुदुर्ग- 2, अकोला- 1 आणि अमरावती- 1 असे आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT