महाराष्ट्रात दिवसभरात Corona तून बरं होणाऱ्या रूग्णांपेक्षा बाधित रूग्णांची संख्या वाढली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनातून 3 हजार 378 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 58 लाख 48 हजार 693 बाधित कोरोनातून मुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 95.91 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 9 हजार 336 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. दिवसभरात बाधित होणाऱ्या रूग्णांची संख्या बरं होण्याऱ्या रूग्णांपेक्षा 5 हजार 958 ने वाढली आहे. ही बाब नक्कीच काळजी करायला लावणारी आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात 123 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.1 टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 25 लाख 42 हजार 943 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 98 हजार 177 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 38 हजार 4 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 198 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यात आज घडीला 1 लाक 23 हजार 225 Active रूग्ण आहेत. आज दिवसभरात राज्यात 9 हजार 336 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या 60 लाख 98 हजार 177 इतकी झाली आहे.

हे वाचलं का?

आज नोंद झालेल्या एकूण 123 मृत्यूंपैकी 96 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 27 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोव्हिड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 183 ने वाढली आहे. हे 183 मृत्यू, सांगली-67, गडचिरोली-20, पुणे-16, नाशिक-12, ठाणे-12, औरंगाबाद-10, सातारा-10, कोल्हापूर-6, नागपूर-6, पालघर-4, सोलापूर-4, हिंगोली-3, रत्नागिरी-3, चंद्रपूर-3, परभणी-2, अहमदनगर-1, अमरावती-1, बीड-1, धुळे-1, लातूर-1 आणि सिंधुदुर्ग-1 असे आहेत.

10 हजारांपेक्षा जास्त रूग्णसंख्या असलेले जिल्हे

ADVERTISEMENT

मुंबई- 12 हजार 295

ADVERTISEMENT

ठाणे – 16 हजार 801

पुणे- 18 हजार 242

सांगली-11 हजार 741

कोल्हापूर – 14 हजार 701

महाराष्ट्रातल्या सांगली, कोल्हापूर, ठाणे, पुणे आणि मुंबई या पाच जिल्ह्यांमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये संख्या कमी जास्त होत असली तरीही साधारणतः आठ ते दहा दिवसांपासून एकाही जिल्ह्यात दहा हजारांपेक्षा कमी रूग्ण झालेले नाहीत. ही बाब नक्कीच चिंतेची आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT