Landslides च्या चार घटनांमध्ये महाराष्ट्रात 47 मृत्यू, 64 लोक बेपत्ता; NDRF ने दिली माहिती
महाराष्ट्रात पावसाने कहर माजवला आहे. अशात अनेक भागांमध्ये दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत त्या त्या ठिकाणी NDRF ची पथकं गेली आहेत. महाराष्ट्रतल्या चार ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये आत्तापर्यंत 47 जणांचा मृत्यू झाला आहे तर याच चार ठिकाणांमधले 64 लोक बेपत्ता आहेत. NDRF चे डीजी सत्यनारायण प्रधान यांनी याबाबतची माहिती […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात पावसाने कहर माजवला आहे. अशात अनेक भागांमध्ये दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत त्या त्या ठिकाणी NDRF ची पथकं गेली आहेत. महाराष्ट्रतल्या चार ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये आत्तापर्यंत 47 जणांचा मृत्यू झाला आहे तर याच चार ठिकाणांमधले 64 लोक बेपत्ता आहेत. NDRF चे डीजी सत्यनारायण प्रधान यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
NDRF ने दिलेली माहिती
पोसरे खेड, या ठिकाणी दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 12 जण बेपत्ता आहेत.
हे वाचलं का?
तळये, रायगड, या ठिकाणी 36 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 34 जण बेपत्ता आहेत
मिरगाव, सातारा या ठिकाणी 10 जण बेपत्ता आहेत
ADVERTISEMENT
अंबेनगर, सातारा या ठिकाणी 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8 जण बेपत्ता आहे
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातल्या चार विविध ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये एकूण 47 मृत्यू झाले आहेत. तर याच चार ठिकाणचे 64 नागरिक बेपत्ता आहे. सर्वात भीषण घटना आहे ती तळये गावातली या ठिकाणी गुरूवारी रात्री दरड कोसळली ती 32 घरांवर. हे ठिकाणी रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या अत्यंत दुर्गम भागात आहे. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यासही उशीर झाला कारण या ठिकाणी जाणारी वाट बिकट आहे. आजच तळये या गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. या गावाच्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला. इतकंच नाही तर अशा घटना घडू नयेत यासाठी डोंगर पायथ्याशी जी गावं आहेत किंवा दुर्गम भागात जी गावं आहेत त्या भागांमधील रहिवाशांचं पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान ज्या चार घटना घडल्या आहेत त्या अत्यंत दुर्दैवी आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा कहर महाराष्ट्रात पाहण्यास मिळाला.
#MaharashtraRains
24/7/21
@NDRFHQ @ WORK
@ 4 diff landslides :
So far ?
???? ?????? ?????(?)
??????? ????? ???????(?)1. Posare,Khed 5(D), 12(M)
2.Talai,Raigad-36 (D) 34 (M)
3.Mirgaon,Satara- M (10)
4.Ambeghar,Satara-6(D) 8(M)Ops On pic.twitter.com/RyUOMsmugA
— ѕαtчα prαdhαnसत्य नारायण प्रधान ସତ୍ଯପ୍ରଧାନ-DG NDRF (@satyaprad1) July 24, 2021
कोल्हापूरमध्येही पावसाचा कहर पाहण्यास मिळाला. कोल्हापूर, सांगली सातारा या ठिकाणीही पावसाचं भीषण आणि रौद्र रूप अवघ्या राज्याने पाहिलं. पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे या नदीजवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत कऱण्यात आलं आहे. या ठिकाीही एनडीआरएफची टीम पोहचली आहे. जीवितहानी होऊ नये यावर NDRF भर देऊन काम करतं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT