औरंगाबाद : महापालिकेच्या कोविड सेंटरमधून ४८ रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा साठा गायब

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून राज्यात रेमडीसिव्हीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. आजही अनेक शहरात रुग्णालयांमध्ये इंजेक्शनचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत औरंगाबाद महापालिकेच्या कोविड सेंटरमधील ४८ रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा साठा गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ADVERTISEMENT

सांगली : रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सेंटर मेलट्रॉन या कोविड सेंटरच्या मुख्य औषध भांडारातून ४८ इंजेक्शन गायब झाली आहेत. या इंजेक्शनची किंमत बाजारात ३१ हजारांच्या घरात असल्याचं कळतंय. हा प्रकार समोर येताच औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. औषध भांडारात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरसह अन्य ४ कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती पाडळकर यांनी दिली.

हे वाचलं का?

…किर्तीरुपी उरावे ! माझं जगून झालंय म्हणत संघ स्वयंसेवकाने ऑक्सिजन बेड गरजूसाठी केला रिकामा

या धक्कादायक प्रकारानंतर महापालिकेने घटनेशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःची बाजू मांडल्यानंतर या प्रकरणात तक्रार दाखल केली जाणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून इंजेक्शनचा काळाबाजार होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी सांगलीत सिव्हील हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने इंजेक्शन चोरल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचा साठा गायब झाल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT