मुंबईत दिवसभरात 4 हजार 966 पॉझिटिव्ह रूग्ण, 5 हजारांहून जास्त रूग्णांना डिस्चार्ज
मुंबईत दिवसभरात 4 हजार 966 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 78 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात 5 हजार 300 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत दिवसभरात 39135 चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत आज घडीला 65 हजार 589 अॅक्टिव्ह केसेस आहेत. मुंबईत कोरोनामुळे दिवसभरात 78 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत एकूण 12990 मृत्यू झाले […]
ADVERTISEMENT
मुंबईत दिवसभरात 4 हजार 966 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 78 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात 5 हजार 300 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत दिवसभरात 39135 चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत आज घडीला 65 हजार 589 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
ADVERTISEMENT
मुंबईत कोरोनामुळे दिवसभरात 78 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत एकूण 12990 मृत्यू झाले आहेत. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 640507 रूग्णांना कोरोना झाला आहे. तर एकूण 560401 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 5341625 चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईचं रूग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 87 टक्के इतका झाला आहे. तर डबलिंग रेट हा 74 दिवसांवर गेला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
मुंबईत लॉकडाऊन होणार का? BMC आयुक्त चहल यांची Exclusive मुलाखत
हे वाचलं का?
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रूग्णांची संख्या कमी होताना दिसते आहे. कठोर निर्बंधाचा हा परिणाम आहे असं मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही म्हटलं आहे.
‘1 मे रोजी लसीच उपलब्ध झाल्या नाहीत तर…’ राजेश टोपे म्हणतात
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी काय म्हटलं आहे?
ADVERTISEMENT
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीमध्ये सुरू झाली. याला आता साधारण 78 दिवस झाले आहेत. या लाटेला आपण गेल्या 78 दिवसांपासून तोंड देतो आहोत. 1 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान आपण 11 लाख 91 हजार टेस्टिंग केली. याचा अर्थ आपण दररोज सरासरी 44 हजारांच्यावर टेस्टिंग करत आहोत. टेस्टिंग कमी नाही हे लक्षात घ्या. जर टेस्टिंग झाल्या नसत्या तर रुग्णालयातील गर्दी वाढली असती.
आपण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, पॉझिटिव्हिटी रेट हा कमी झाला आहे. याआधी 100 टेस्टमध्ये 31 जण पॉझिटिव्ह सापडत होते. आता ही संख्या साडे बारा टक्क्यांवर आली आहे. मागील आठवड्यात आपल्याकडे 4000 बेड्स रिकामे होते. आता 5200 बेड्स रिकामे आहेत. म्हणजेच रुग्ण कमी येत आहेत असंही मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं. मुंबई तकला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT