पाच वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने घातली झडप; वडिलांनी जबड्यातून ओढलं बाहेर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इम्तियाज मुजावर, सातारा

ADVERTISEMENT

वडिलांसोबत शेतात गेलेल्या एका पाच वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने झडप घातल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सातारा जिल्ह्यात घडली. बिबट्या मुलाला घेऊन जात असताना वडिलांनी प्रसंगावधान राखत पाय धरून ओढल्यानं मुलाला जीवदान मिळालं.

कराड तालुक्यातील किरपे गावात आज (२० जानेवारी) सायंकाळी ६ वाजता धनंजय देवकर हे शेतातील काम उरकून घरी जाण्यासाठी निघाले होते. निघण्यापूर्वी शेती कामासाठीची साहित्य पिशवीत ठेवत होते. त्यांचा लहान मुलगा राज धनंजय देवकर (वय ५ वर्ष) हा त्यांच्या जवळच होता. शेती अवजार वडिलांना उचलून देण्यासाठी राज खाली वाकलेला असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने राजच्या मानेला पकडलं आणि ओढून शेतात घेऊन जाऊ लागला.

हे वाचलं का?

भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे नागपुरात चार वर्षीय मुलीचा मृत्यू

दरम्यान, राजला बिबट्याने पकडल्याचं लक्षात येताच धनंजय देवकर यांनी प्रसंगवधान राखत आणि धैर्याने मुलाचे पाय पकडले. मुलाला बिबट्याच्या तोंडातून सोडविण्यासाठी ओढू लागले. यावेळी त्यांनी आरडाओरडाही केला. बिबट्या मुलाला ओढत शेतालगत असलेल्या तारेच्या कुपनापर्यंत गेला, पण कुपनाला धडकल्याने त्याला मुलाला पुढे ओढता आले नाही आणि त्याने राजला सोडले. धनंजय देवकर यांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानं सुदैवाने राजला जीवदान मिळालं.

ADVERTISEMENT

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात राज देवकर याच्या मानेला व कानाला बिबट्याचे दात लागले आहेत. तर पाठीवर व पायावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. चिमुकल्याला पुढील वैद्यकीय उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

सातारा : गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, सहायक वनसंरक्षक महेश झांझुरणे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल व वनरक्षक तसेच पोलीस पाटील किरपे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. बिबट्याने केलेल्या हल्ल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळवली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT