महाराष्ट्रात दिवसभरात 58 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्ण, 351 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 58 हजार 924 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 351 मृत्यूंची नोंद झाली आहे. महराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये 351 मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण 38 लाख 98 हजार 262 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आत्तापर्यंत राज्यात एकूण 60 हजार 824 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

आज घडीला राज्यात 37 लाख 43 हजार 968 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 27 हजार 81 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्राचा मृत्यू दर 1.56 टक्के इतका आहे. महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 81.4 टक्के इतका आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 31 लाख 59 हजार 240 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

राज्यातील किराणा दुकानं सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरू ठेवण्याचा विचार-राजेश टोपे

हे वाचलं का?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 40 लाख 75 हजार 811 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 38 लाख 98 हजार 262 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज घडीला 6 लाख 76 हजार 520 रूग्ण सक्रिय आहेत. दिवसभरात 58 हजार 924 नव्या रूग्णांची भर पडल्याने आता राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 38 लाख 98 हजार 262 इतकी झाली आहे.

दिवसभरात नोंद झालेल्या 351 मृत्यूंपैकी 220 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 85 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 46 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. हे मृत्यू अहमदनगर 8, ठाणे 8, नाशिक 7, परभणी 4, नागपूर 3, पालघर 3, जळगाव 2, नांदेड 2, पुणे 2, रायगड 2, सोलापूर 2, वाशिम 2 आणि औरंगाबाद 1 असे आहेत.

ADVERTISEMENT

‘ही’ आहेत कोव्हिड संवदेनशील राज्यं, महाराष्ट्र सरकारने केली यादी जाहीर

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

मुंबई 85 हजार 321

ठाणे 80 हजार 976

पालघर 12 हजार 627

रायगड 12 हजार 233

पुणे 1 लाख 25 हजार 96

सातारा 13 हजार 398

सोलापूर 12 हजार 504

नाशिक 40 हजार 335

अहमदनगर 19 हजार 983

जळगाव 13 हजार 122

औरंगाबाद 14 हजार 393

बीड 10 हजार 663

लातूर 18 हजार 101

परभणी 12 हजार 431

नांदेड 13 हजार 497

नागपूर 76 हजार 961

भंडारा 14 हजार 957

चंद्रपूर 14 हजार 893

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT