सांगली : महापालिका क्षेत्रात सात दिवसांचा जनता कर्फ्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सांगली महानगरपालिका क्षेत्रात वाढत जाणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता बुधवारपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. महापालिकेत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याबद्दल निर्णय घेण्यात आला. या काळात, दूध, मेडीकल आणि वैद्यकीय सेवा वगळता सर्व गोष्टी बंद राहणार आहेत.

ADVERTISEMENT

औरंगाबाद : जेव्हा न्यायालय सरकारच्या लॉकडाउन नियमांची पोलखोल करतं

महापौर दिग्वीजय सूर्यवंशी यांनी आज यासंदर्भातली घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होते आहे. या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापौरांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सर्व नेत्यांच्या संमतीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. ५ मे ते ११ मे या काळात सांगलीत जनता कर्फ्यू असणार आहे.

हे वाचलं का?

या बैठकीत जनता कर्फ्यूमधून मेडीकल आणि दूध वितरकांना मूभा देण्यात आली आहे. जनतेने कर्फ्यूचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन महापौरांनी केलं. दरम्यान सांगलीत अजुनही रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण कमी होताना दिसत नाहीये.

बारामतीत बुधवारपासून ७ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर

ADVERTISEMENT

सांगलीच्या खटाव भागात राहणाऱ्या विमल पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या शरिरातील ऑक्सिजन पातळी कमी व्हायला लागल्यामुळे नातेवाईकांनी तात्काळ ऑक्सिजनची सोय करुन बेड शोधण्यास सुरुवात केली. परंतू सध्याचं लॉकडाउन आणि बेड्सची कमतरता पाहता विमल पवार यांचे नातेवाईकांनी त्यांना मालवाहू रिक्षेत झोपवून शहरभर बेड्सची शोधाशोध करायला सुरुवात केली.

ADVERTISEMENT

बऱ्याच ठिकाणी शोधमोहीम गेल्यानंतरही विमल पवार यांना बेड उपलब्ध झाला नाही. अखेरीस पवार यांच्या नातेवाईकांनी रिक्षा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर आणून उभी केली. यानंतर सुधीर गाडगीळ यांनी विविधी हॉस्पिटल्समध्ये चौकशी करुन विमल पवार यांच्यासाठी एका बेडची सोय करुन दिली. विमल पवार यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातंय.

बारामतीत बुधवारपासून ७ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT