यवतमाळ : दारु न मिळाल्यामुळे सॅनिटायजर प्यायलं, ७ जणांचा मृत्यू
लॉकडाउनच्या काळात राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद ठेवली आहेत. परंतू या काळात राज्यातील तळीरामांना स्वतःवर नियंत्रण ठेवणं जड जाताना दिसतंय. यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात दारु न मिळाल्यामुळे सॅनिटायजर प्यायलेल्या ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वणी शहरातील तेली फैल भागातील दत्ता लांजेवार आणि नूतन पथरकर हे दोघेही इसम दारुच्या शोधात […]
ADVERTISEMENT
लॉकडाउनच्या काळात राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद ठेवली आहेत. परंतू या काळात राज्यातील तळीरामांना स्वतःवर नियंत्रण ठेवणं जड जाताना दिसतंय. यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात दारु न मिळाल्यामुळे सॅनिटायजर प्यायलेल्या ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
ADVERTISEMENT
वणी शहरातील तेली फैल भागातील दत्ता लांजेवार आणि नूतन पथरकर हे दोघेही इसम दारुच्या शोधात होते. परंतू लॉकडाउन काळात दारुची दुकानं बंद असल्यामुळे त्यांची चांगलीच गैरसोय होत होती. या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात दोघेही अपयशी ठरल्यामुळे त्यांनी अखेरीस सॅनिटायजर पिण्याचा निर्णय घेतला. सॅनिटायजर पिऊन दोघेही घरी गेल्यानंतर त्यांच्या छातीत दुखायला लागलं. यानंतर शुक्रवारी रात्री या दोघांना घरच्यांनी रुग्णालयात भरती केलं. रुग्णालयात काही काळ उपचार घेतल्यानंतर दत्ता आणि नूतन यांना घरी सोडण्यात आलं.
हे वाचलं का?
परंतू मध्यरात्री दोघांच्या छातीत पुन्हा दुखायला लागलं, ज्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला. वणी शहरातील अशाच एका घटनेत एकता नगर भागातील संतोष मेहर, गणेश नांदेकर, सुनील ढेंगले, गणेश शेलार आणि एका इसमाने दारु मिळत नसल्यामुळे सॅनिटायजर प्यायल्याचं समोर आलं. या सर्वांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीत मृतांच्या नातेवाईकांनी सॅनिटायजर प्यायल्यानंतर त्रास सुरु झाल्याची माहिती दिली. एकीकडे राज्यात प्रत्येक दिवशी आरोग्य यंत्रणेवर ताण येऊन अनेक अपघात व दुर्घटना घडत असताना….यवतमाळमध्ये घडलेली ही घटना प्रशासनाच्या चिंतेत भर घालणारी आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT