महाराष्ट्रात दिवसभरात 9 हजारांहून अधिक Corona रूग्णांना डिस्चार्ज, 188 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 9 हजार 43 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण 57 लाख 42 हजार 258 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 95.9 टक्के इतका झाला आहे. आज महाराष्ट्रात 8 हजार 470 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे.

ADVERTISEMENT

राज्यात आज 188 कोरोना बाधित मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.98 टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 98 लाख 86 हजार 554 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59 लाख 87 हजार 521 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 58 हजार 863 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. 4 हजार 196 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. राज्यात आज घडीला 1 लाख 23 हजार 340 सक्रिय रूग्ण आहेत. आज महाराष्ट्रात 8 हजार 470 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 59 लाख 87 हजार 521 इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण 188 मृत्यूंपैकी 143 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 45 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 294 ने वाढली आहे. हे 294 मृत्यू, नाशिक-70, ठाणे-55, अहमदनगर-33, पुणे-24, नागपूर-22, सांगली-15, सातारा-14, औरंगाबाद-9, रत्नागिरी-9, अकोला-8, भंडारा-5, पालघर-5, यवतमाळ-5, रायगड-4, उस्मानाबाद-3, जळगाव-2, लातूर-2, सोलापूर-2, बीड-1, चंद्रपूर-1, धुळे-1, जालना-1, कोल्हापूर-1, परभणी-1 आणि सिंधुदुर्ग-1 असे आहेत.

हे वाचलं का?

Delta Plus: लस आणि प्रतिकारशक्ती या दोन्हीला चकमा देऊ शकतो कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट: तज्ज्ञ

10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेले जिल्हे

ADVERTISEMENT

मुंबई – 18 हजार 432

ADVERTISEMENT

ठाणे – 13 हजार 570

पुणे- 16 हजार 955

महाराष्ट्रातल्या पुणे, मुंबई आणि ठाणे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT