पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षांच्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू, जुन्नरमधली घटना
स्मिता शिंदे, प्रतिनिधी, जुन्नर ओढ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका बारा वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथे गुरूवारी ( दि १४) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. साहील राजू लोखंडे (वय १२) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की, सध्या पिंपळगावजोगा कालव्याचे आवर्तन […]
ADVERTISEMENT
स्मिता शिंदे, प्रतिनिधी, जुन्नर
ADVERTISEMENT
ओढ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका बारा वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथे गुरूवारी ( दि १४) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. साहील राजू लोखंडे (वय १२) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे
हे वाचलं का?
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सध्या पिंपळगावजोगा कालव्याचे आवर्तन सुरु असून या कालव्याद्वारे वडगाव आनंद परिसरातील एका ओढ्यात पाणी सोडण्यात आले आहे. गुरुवारी शाळेला सुट्टी असल्याने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वडगाव आनंद येथील वृत्तपत्र विक्रेते राजू लोखंडे यांचा मुलगा साहील त्याच्या मित्रांसमवेत या ओढ्यात पोहण्यासाठी गेला होता. सर्व जण पोहत असताना साहिलला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो पाण्यात बुडाला.
ठाण्यातील दुर्दैवी घटना : पाण्याची टाकी धुण्यासाठी उतरलेल्या दोघांचा मृत्यू
ADVERTISEMENT
सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा करत जवळील ग्रामस्थांच्या मदतीने त्याला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.दरम्यान बाजूला असलेल्या नागरिकांनी साहील यास पाण्याबाहेर काढून तात्काळ उपचारासाठी आळेफाटा येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच वडगाव आनंद परिसरातील नागरिकांनी ओढ्यावर एकच गर्दी केली. मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी आक्रोश केला. साहील लोखंडेच्या मुत्यूमुळे वडगाव आनंद परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT