एकटेपणा, नैराश्य, गरिबी अन् आईची हत्या; 4 दिवस मृतदेहाशेजारी बसून लिहिली 77 पानी सुसाईड नोट
आयुष्यात नातेसंबंध जपणं फार गरजेचं असतं कारण एकदा का नातं खराब झालं कि ते पुन्हा ठिक होईलच याची शाश्वती नसते. त्यावेळी नातं टिकवण्यासाठी माणूस म्हणून आपण सतर्क असलं पाहिजे. कारण दिल्लीमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील क्षितीज नावाच्या मुलाने आपल्या आईची हत्या करत आत्महत्या केली. विशेष म्हणजे त्यानं आत्महत्येपूर्वी 77 पानांची सुसाईड नोट […]
ADVERTISEMENT
आयुष्यात नातेसंबंध जपणं फार गरजेचं असतं कारण एकदा का नातं खराब झालं कि ते पुन्हा ठिक होईलच याची शाश्वती नसते. त्यावेळी नातं टिकवण्यासाठी माणूस म्हणून आपण सतर्क असलं पाहिजे. कारण दिल्लीमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील क्षितीज नावाच्या मुलाने आपल्या आईची हत्या करत आत्महत्या केली. विशेष म्हणजे त्यानं आत्महत्येपूर्वी 77 पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.
ADVERTISEMENT
क्षितीजनं आपल्या आईची हत्या केल्यानंतर घटनास्थळी 77 पानांची सुसाईड नोट ठेवली. त्यामध्ये त्यानं आईचा खून का केला, त्याला जीवनात कोणत्या गोष्टींचा त्रास होता याबाबत लिहून ठेवलं आहे. आईची हत्या केल्यानंतर त्याने 4 दिवस आपल्या आईच्या मृतदेहासोबत घालवले. मानसिक तणाव, गरिबी, एकाकीपणा या सर्व गोष्टीतून तो जात असल्याचं त्यानं नोटमध्ये लिहिलं आहे. 77 पानांची ही सुसाईड नोट कोणालाही धक्का बसेल.
क्षितीजनं आपल्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?
क्षितीजनं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले की तो गेले दोन वर्षांपासून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. स्वत: मरण्याच्या अगोदर त्याला आईला दु:खातून मुक्त करायचं होतं. दर रविवारी त्याची आई सत्संगाला जात असे. यानंतर त्याची आई जेव्हा सत्संगावरुन येत असे त्यावेळी त्या दोघांमध्ये थोडा वादविवाद होत असे. आईला मोतीबिंदू झाला आहे असं वाटतं. आज गुरुवार आहे. बाईकच्या केबलने त्यांने आपल्या आईचा गळा गोठला कारण मरताना आपल्या आईला दुखू नये अशा सर्व गोष्टी त्यानं सुसाईट नोटमध्ये लिहिल्या आहेत.
हे वाचलं का?
नोटमध्ये क्षितीज पुढे लिहितो जशी केबल खेचली तसा पुढच्या 5 सेकंदात आईचा जीव निघून गेला. त्याला माहित होते की ऑक्सिजन डोक्यापर्यंत न पोहोचल्यानं मृत्यू लवकर होतो. आई खाली पडल्यानंतर त्यानं आपल्या आईचं डोकं मांडीवर घेतलं. त्यानंतर दहा मिनीटं त्याने गळा दाबून धरला आणि आईचा जीव गेल्यानंतर लगातार 24 तास क्षितीज रडत राहिला. जीव गेल्यानंतर आईचे डोळे उघडेच होते त्याने खूप प्रयत्न केले तरही ते बंद झाले नाहीत.
गंगाजलने आईचा चेहरा धुतला
पुढे त्यानं लिहिलं आज शुक्रवार आहे. आईच्या शरिराकडं बघवलं जात नाहीये. म्हणून त्याने गंगाजलने आपल्या आईचा चेहरा धुतला. तिच्या जवळ बसून त्यानं भगवत गितेचा 18 वा अध्याय वाचला. तो पूर्ण भगवत गिता वाचू शकला नाही. त्यानंतर भगवत गिता आईच्या अंगावर ठेवून आत्महत्या करण्यासाठी पुढे सरसावला. पहिल्यांदा त्याने बंदूक खरेदी करण्याचा प्रयत्न केला, मग इलेक्ट्रिक कटरचा विचार आला. त्यानंतर तो दोन-तीन दुकानात गेला पण त्याला कोणीच इलेक्ट्रिक कटर दिला नाही. नंतर तो घरी आला आणि आईच्या मृतदेहाशेजारी बसून रडला.
ADVERTISEMENT
पुढे तो लिहितो आईला जाऊन आता 71 तास झाले आहेत. वास येऊ लागला आहे. आईचा गळा कटरने कापला. शुक्रवारच्या रात्रीपासून आईच्या मृतदेहाचा वास येत होता. आईचा मृतदेह त्यानंतर तो बाथरुममध्ये घेऊन गेला आणि वास येऊ नये म्हणून दरवाजा लाऊन घेतला. तो फक्त त्याची सुसाईड नोट पूर्ण करु इच्छित होता. वास संपूर्ण घरात पसरला होता. आज शनिवार आहे, तीन दिवसांपासून त्यानं काही खालेल्लं नाही. त्यानंतर त्याला लक्षात आलं की त्यानं स्वयंपाक घरात गरम पाणी उकळायला ठेवलं आहे.
ADVERTISEMENT
मास्क लाऊन सुसाईड नोट लिहित राहिला
क्षितीज सुसाईड नोटमध्ये सर्व काही लिहीत होता. त्याने पुढे लिहिले की खोलीतील वास थांबत नव्हता. त्यामुळे त्याची प्रकृतीही ढासळू लागली आहे. त्याने लाकडी पेन्सिलचा भुसा जाळला, उदबत्ती पेटवली. घरात जायफळ ठेवले होते, तेही जाळले. सर्व डीओ देखील घरामध्ये मारले. तो मास्क घालून सुसाईड नोट पूर्ण करत होता. आज रविवार आहे. सध्या दुपारचे दोन वाजले आहेत. तीन दिवसांपासून आतापर्यंत प्रॉपर्टी डीलर तीन वेळा भाडेकरूंसह भाड्याने मजला दाखवण्यासाठी आले होते. पण आज कोणत्याही परिस्थितीत तो नोट पूर्ण करणार होता.
आता आत्महत्या करण्याची वेळ
सुसाईड नोट पूर्ण करायची असल्याने रविवारी मरण्याच्या तयारीत तो बराच वेळ लिहीत राहिला. त्यांनी पुढे लिहिले आज रविवार आहे, आईला सत्संगाला जायचे आहे. आईची मैत्रीण पुन्हा पुन्हा फोन करत आहे. आधी आईच्या फोनवर, नंतर माझ्या फोनवर. नंतर त्यानं फोन उचलला. आईची मैत्रिण विचारत आहे मिथलेश फोन उचलत नाही, कुठे आहे? तो म्हणाला की आई मेली आहे, त्याने तिला चार दिवसांपूर्वी मारले आहे, आता तो मरण्याच्या तयारीत आहे. हे सर्व पाहून खूप भीती वाटत आहे. वडील गेल्यानंतर आईच्या सासऱ्यांनी वडिलांप्रमाणे त्यांची खूप काळजी घेतली. त्यामुळे माझ्या मृत्यूनंतर माझी बाईक त्यांच्या नावावर असेल असे त्यानं जाहीर केलं. मावशीने आईचा अंत्यसंस्कार करावा, अशी त्याची इच्छा आहे.
मित्र त्याचा मजाक उडवत असत
सुसाईड नोटमध्ये क्षितीजने एका ठिकाणी आपल्या कुटुंबाबद्दल लिहिलं आहे. त्याचे पालनपोषण चांगले झाल्याचे त्याने सांगितले. वडिलांची सरकारी नोकरी होती. त्याला एका नामांकित शाळेत शिकवले. नंतर तो शिक्षणाकडे दुर्लक्ष करू लागला. तो वर्गातील सर्वात भित्रा, नम्र मुलगा होता. त्याला आयुष्यात दोनच मित्र होचे. ते नेहमी त्याचा मजाक उडवत असत. त्याने शिक्षकांकडे अनेकदा तक्रार केली. पण कोणी ऐकले नाही. स्कूल बसमध्ये चढताना त्याच्या आत एक भीती, लाज, अस्वस्थता असे. त्याची आई त्याची आशा होती. वडील गेल्यानंतर आई आणि तो एकटा पडला. त्याचे वडिलांनी त्यांना अशा वेळी सोडून गेले जेव्हा त्यांना सर्वात जास्त गरज होती.
‘डिप्रेशन आहे, मला झोप येत नाही’
क्षितीज पुढे त्याच्या आईबद्दल लिहितो की त्याला चांगलं सांभाळण्यासाठी त्याच्या आईने शिवणकाम केले. त्याची आई म्हणायची की लहान मुलांना शिकवायला सुरुवात कर. ते ऐकून तो खूप घाबरायचा. दहावीत असताना वडिलांचे निधन झाले. लग्नाच्या 14 वर्षांनंतर त्याचा जन्म आई-वडिलांच्या घरी झाला होता. तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. दिल्ली विद्यापीठाच्या SOL मध्ये त्यानं प्रवेश घेतला होता पण नशिबाने फसवले. दोनदा नापास झाला. नैराश्य कायम राहिले. पाच रात्री तो जागला त्याला झोप येत नाही. कधी कधी तो बेशुद्ध पडून देखील असे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT