सातारा: शिकारीसाठी आलेला बिबट्या थेट घरात शिरला, पुढे जे घडलं…
इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा सातारा जिल्ह्यातील मोजे हेळवाक, ता पाटण, जिल्हा सातारा येथे सुधीर कारंडे यांच्या राहत्या घरात बिबट्या शिरला आणि एकच खळबळ उडाली. विलास कारंडे यांच्या घरातील सर्व हे देवीच्या विसर्जनाच्या साठी घर बाहेर होते. अचानक बघता बघता बिबट्या घराच्या शिरला आणि एकच खळबळ उडाली संपूर्ण आरडा ओरडा सुरू झाला. मात्र अशातच घरातल्या एका […]
ADVERTISEMENT
इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा
ADVERTISEMENT
सातारा जिल्ह्यातील मोजे हेळवाक, ता पाटण, जिल्हा सातारा येथे सुधीर कारंडे यांच्या राहत्या घरात बिबट्या शिरला आणि एकच खळबळ उडाली. विलास कारंडे यांच्या घरातील सर्व हे देवीच्या विसर्जनाच्या साठी घर बाहेर होते. अचानक बघता बघता बिबट्या घराच्या शिरला आणि एकच खळबळ उडाली संपूर्ण आरडा ओरडा सुरू झाला. मात्र अशातच घरातल्या एका व्यक्तीने प्रसंगावधान राखून सगळ्यांना बाहेर काढलं आणि घराचं दार बंद केलं. आता वन विभागाचं पथक या ठिकाणी पोहचलं आहे.
गुरूवारी काय घडली घटना?
सातारा जिल्ह्यातलं कोयनेचं जंगल हे खूप मोठं आहे. या ठिकाणी बिबटे बऱ्याचदा कुत्र्यांची शिकार करतात. कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रय़त्नात असलेला एक बिबट्या हेळवाक गावात शिरला. शिकारीचा हा थरार ग्रामस्थांनी पाहिला. बिबट्या शिकारीसाठी धावत असतानाच कुत्रा जीव वाचवण्यासाठी एका घरात शिरला. मात्र बिबट्यानेही पाठलाग थांबवला नाही. हा बिबट्याही कुत्र्याच्या पाठोपाठ घरात शिरला. त्यानंतर एकच आरडाओरडा सुरू झाला. मात्र घरमालक सुधीर कारंडे यांनी दाराला बाहेरून कडी लावली. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली.
हे वाचलं का?
वनविभागाच्या चार तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्या पिंजऱ्यात
वनविभागाची टीम घटनास्थळी आल्यानंतर सुमारे चार तास त्यांचे बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर चार तासांनी बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला आणि सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या बिबट्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आलं आहे.
बिबट्या घरात शिरल्याचं पाहताच सुधीर कारंडेंनी कडी लावली
बिबट्या शिकारीच्या पाठोपाठ आपल्या घरात शिरल्याचं पाहताच सुधीर कारंडे यांनी कडी लावून घेतली. बिबट्या घरात शिरला आहे हे वनविभागाला सांगण्यात आलं. त्यानंतर वनविभागाची टीम या ठिकाणी दाखल झाली. बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू होते. या वेळात बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनीही गर्दी केली होती. अखेर चार तासांनी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT