Viral Video: सोसायटीत उभी असलेली कार थेट विहिरीत बुडाली, धक्कादायक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: इमारतीच्या आवारात उभी असलेली एक कार अचानक विहिरीत बुडाल्याची धक्कादायक घटना मुंबईतील घाटकोपरमध्ये (Ghatkopar Car Viral Video) घडली आहे. ज्याचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील (Mumbai) घाटकोपरमधील कामा लेन येथील रामनिवास या जुन्या सोसायटीत ही घटना घडली आहे. ही घटना आज (13 जून) सकाळी साधारण साडे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. मात्र, याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे.

नेमकी घटना काय आहे हे आधी आपण समजून घेऊयात:

हे वाचलं का?

घाटकोपर पश्चिममधील ही रामनिवास सोसायटी ही अनेक वर्ष जुनी आहे. याच सोसायटीच्या एका भागात तीन ते चार कार पार्क करण्यात आल्या होत्या. खरं तर हा सोसायटीच्या परिसरातील एक साधारण पार्किंग एरिया असल्याचं दिसून येतंय. अगदी एखादा रस्ता असावा त्याप्रमाणे. पण आज सकाळच्या सुमारास अचानक एक कार उभी असलेली जमीन खचली आणि तिथे उभी असलेली कार थेट खोल पाण्यात जाऊन बुडाली.

खरं तर जेव्हा ही कार बुडाली तेव्हा पार्किंग एरियामध्ये कुठेही पाणी दिसत नव्हतं. पण अचानक जमीन खचली आणि काही क्षणात कार दिसेनाशी झाली. दरम्यान, जेव्हा ही घटना घडली तेव्हा याची दृश् कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे.

ADVERTISEMENT

Malad Building Collapse : मुंबईत सध्याच्या घडीला ४०७ इमारती धोकादायक अवस्थेत

ADVERTISEMENT

पार्किंग एरियामधील जमीन खचली तरी कशी?

मिळालेल्या माहितीनुसार या सोसायटीमधील जो पार्किंग एरिया तयार करण्यात आला होता तिथं खरं तर एक जुनी विहीर होती. ज्याचा अर्धा भाग हा काही वर्षापूर्वीच आरसीसी बांधकाम करुन झाकून टाकण्यात आला होता.

याच भागात सोसायटीतील रहिवाशी आपल्या गाड्या देखील पार्क करायचे. पण मागील काही दिवसापासून सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे विहिरीवरील आरसीसी बांधकाम खचलं आणि काही क्षणात कारला जलसमाधी मिळाली. दरम्यान, यावेळी कारच्या बाजूला इतरही दोन कार पार्क करण्यात आल्या होत्या. पण सुदैवाने त्या दोन्ही कार बुडाल्या नाही.

माळशेज घाटात दरड कोसळून चारचाकी गाडीचा चक्काचूर

बुडालेली कार नेमकी आहे तरी कुठे?

ही घटना घडताच सोसायटीतील नागरिकांनी तात्काळ याबाबतची माहिती प्रशासनाला दिली. ज्यानंतर प्रशासनाने या परिसरात जाऊन आता कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. इथे आता पंप लावून विहिरीतील पाणी उपसण्याचं काम सुरु आहे. त्यानंतर कार नेमकी कुठे आहे हे समजणार आहे.

बुडालेली कार बाहेर काढण्यासाठी एक क्रेन देखील मागविण्यात आली आहे. मात्र, कार नेमकी आहे कुठे याचा अद्याप पत्ता लागलेला नाही.

मुंबई, ठाण्यात Orange Alert! रायगड, रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता

पाहा या दुर्घटनेबाबत कार मालकाचं नेमकं म्हणणं काय:

मिळालेल्या माहितीनुसार ही कार याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या पंकज मेहता यांची आहे. या घटनेविषयी नेमकी माहिती जाणून घेण्यासाठी ‘मुंबई तक’ने पंकज मेहता यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी याविषयी अशी माहिती दिली की, ‘ही घटना सकाळी साडे आठ वाजता घडली.’

‘आमची दुसरी कार ही कम्पाउंडच्या दुसऱ्या बाजूला आहे. ती साफ करणाऱ्या मुलाने सर्वप्रथम आम्हाला सांगितलं की, आमची कार अचानक वाकडी होत आहे. तेव्हा आम्ही घराच्या बाहेर येऊन पाहू लागलो.’

‘तेवढ्यात गाडी आणखी खालच्या दिशेने झुकू लागली. त्यामुळे आम्ही कारचे फोटो घेणं सुरु केलं. त्याचवेळी आमच्या नजरेसमोर गाडी थेट आत जाऊन बुडाली. ही विहीर 30 ते 40 फूट खोल असण्याची शक्यता आहे.’

‘आता आम्ही पंप टाकून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर क्रेनने गाडी बाहेर काढू. ही विहीर जवळजवळ 100 ते 150 वर्ष जुनी आहे. पण ती चांगली देखभाल केली जाते. तिच्यावरील बांधकाम देखील मजबूत आहे. पण आता हे कसं घडलं हे सांगता येणार नाही.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT