चंद्रपूर- वेळीच बेड न मिळाल्यामुळे रूग्णालयाजवळच्या झाडाखाली रूग्णाने सोडले प्राण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रूग्णांची संख्या वाढतच जाताना दिसतेय. चंद्रपूरमध्ये रूग्णसंख्या वाढत असून बेड्सची कमतरताही जाणवू लागली आहे. तर चंद्रपुरात कोरोनाबाधित रूग्णाला वेळीच बेड न मिळाल्याने रूग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

चंद्रपूर जिल्ह्यात 14 हजाराच्या आसपास कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. त्यातच बेड, डॉक्टर, इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची मागणी प्रचंड वाढली आहे. भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा याठिकाणी बेड न मिळाल्याने कोरोना बाधित रूग्णाने झाडाखालीच प्राण सोडले आहेत.

चंद्रपुरात वेळीच बेड न मिळाल्याने अत्यवस्थ स्थितीत कडुलिंबाच्या झाडाखाली आसरा घेतलेल्या कोरोना बाधिता रूग्णाचा मृत्यू झालाय. चंद्रपुर शहरातील मुख्य सरकारी कोव्हिड रुग्णालयाच्या परिसरात घटना घ़डली आहे. या रूग्णाला बेड मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी यंत्रणेला जागं केल्यावर संबंधित रूग्णाला बेड देण्यात आला. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच रूग्णाने प्राण सोडले. उपचारांमध्ये 12 तास विलंब झाल्यामुळे बापू कापकर या रूग्णाचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

बेड मिळण्यासाठी विलंब झाल्यामुळे या कोरोनाबाधित रूग्णाला जीव गमवावा लागला. जिल्ह्यातील कोरोना उपचाराची असहाय्य स्थिती उघड झाली असून अन्य कोणावर अशी वेळ आणू नये अशी विनंती आता मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून सरकारला करण्यात येतेय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT