नोकरीच्या पहिल्याच दिवशी आला कंटाळा, सुरक्षा रक्षकाने 7 कोटींच्या चित्रावर बॉलपेनने काढले डोळे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कंटाळा येणं ही बाब काही नवीन नाही. कंटाळा प्रत्येकाला येतो. कोरोना काळात लोकांना घरी बसूनही कंटाळा आलाच. मात्र हा कंटाळा भलंमोठं नुकसानही करू शकतो ही बाब आता समोर आली आहे. एका सुरक्षा रक्षकाने नोकरीच्या पहिल्या दिवशी कंटाळा घालवायचा म्हणून एका चित्रावर बॉलपेनने डोळे काढले. आता याबाबतची बातमी व्हायरल झाली आहे. कारण हे चित्र साधसुधं नाही तर त्याची किंमत 7 कोटी रूपयांहून जास्त आहे.

ADVERTISEMENT

सुरक्षा रक्षकाने या एक लाख मिलियन डॉलर्स अर्थात भारतीय चलनानुसार 7 कोटींहून अधिक रूपये किंमतीच्या चित्राची सुरक्षा करणं अपेक्षित होतं. मात्र कंटाळा घालवण्याच्या नादात त्याने याच कलाकृतीवर बॉलपेन घेऊन डोळे रंगवले. रशियातील ओब्लास्ट प्रांतात असलेल्या येल्टसीन सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. विशेष बाब म्हणजे ज्या सुरक्षा रक्षकाने हे कृत्य केलं आहे त्याचा नोकरीचा पहिलाच दिवस होता. या नंतर या सुरक्षा रक्षकाला कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. तसंच पोलिसांनी या प्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल केला आहे.

हे वाचलं का?

रशियातलं हे चित्र 1934 च्या सुमारासचं आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे की या सुरक्षारक्षकाने असं का केलं? हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र प्राथमिक अंदाज असा आहे की त्याला आलेल्या कंटाळ्यातून त्याने हे कृत्य केलं आहे. The Art News Paper हे रशियातलं वृत्तपत्र आहे त्यांनी सर्वात प्रथम ही बातमी दिली आहे. या वृत्तात असंही म्हटलं गेलं आहे की सुदैवाचा भाग इतकाच की या सुरक्षा रक्षकाने पेनने अत्यंत गडदपणे हे डोळे रंगवलेले नाहीत. हलक्या हातानेच त्याने या चित्रावर डोळे रंगवले आहेत. आता याबाबत काय करता येईल याचा ती आर्ट गॅलरी सर्व बाजूने विचार करते आहे.

डिसेंबर 2020 या महिन्यात हा प्रकार घडला आहे. सुरक्षा रक्षकाचं नाव समजू शकलेलं नाही. मात्र त्याचं वय 60 वर्षे आहे अशी माहिती समोर आली आहे. ‘द वर्ल्ड अ‍ॅज नॉन-ऑब्जेक्टिव्हिटी, द बर्थ ऑफ अ न्यू आर्ट’ या प्रदर्शनात हे चित्र ठेवण्यात आलं होतं. याच ठिकाणी हा सारा धक्कादायक प्रकार घडलाय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT