Pune : ससून रूग्णालयातून नर्सच्या वेशातील महिलेने पळवलं तीन महिन्यांचं बाळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातल्या ससून रूग्णालयात नर्सच्या वेशात आलेल्या एका महिलेने तीन महिन्यांच्या मुलीला पळवल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. वंदना मल्हारी जेठे (रा. खराडी) असे आरोपी महिलेचे नाव आहे. पुणे स्टेशन परिसरात 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार घटनेला आठवडा होत नाही, तोवर एका रिक्षाचालकाने 6 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्काराची घटना घडली.या दोन्ही घटनांनी पुणे शहर हादरून गेले असताना.त्याच परिसरात असलेल्या ससून रूग्णालयात एक महिला तीन महिन्याच्या मुलीला पळवल्याची घटना घडली.

ADVERTISEMENT

या घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही तासांत आरोपी महिलेला पकडण्यात पोलिसांना यश आले असून तीन महिन्याच्या मुलीला सुखरूप आईच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही आरोपी महिला उच्चशिक्षित असून तिला अनेक वर्षापासून मूल होत नव्हते.यातून तिने मुलीला चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयात गुरूवारी दुपारी कासेवाडी भागात राहणारी एक महिला तिच्या तीन महिन्याच्या मुलीसह एक मैत्रिणीसोबत आली होती.तेव्हा त्या महिले सोबत असलेली मैत्रिण काही कामानिमित्त बाहेर गेली.त्यानंतर काही मिनिटानी आरोपी वंदना ही नर्सच्या वेशात त्या महिलेकडे गेली आणि म्हणाली की, तुम्हाला बाहेर त्यांनी बोलावले आहे. मी बाळाला सांभाळते महिला नर्सच्या वेशात असल्याने त्या महिलेने विश्वासाने मुलीला आरोपी महिलेकडे दिले. काही मिनिटांनी त्या मुलीची आई ज्या महिलेकडे आपण मुलीला दिले.तिथे येऊन पाहिले असता ती आरोपी महिला कुठेही दिसत नव्हती.

हे वाचलं का?

याबाबतची माहिती ससून रूग्णालयाचा सुरक्षारक्षक आणि पोलिसांना महिलेने दिली. त्यानंतर सीसीटीव्ही देखील तपासण्यात आलं. त्यामध्ये आरोपी महिला रुग्णालयाच्या बाहेरील एका रिक्षात मुलीला घेऊन बसताना दिसली त्यानंतर तेथील रिक्षावाल्यांना याबाबत विचारणा केल्यावर, ज्या रिक्षात आरोपी महिला गेली होती. तो रिक्षावाला एकाचा मित्र असल्याचे समजले. त्या मित्राने आरोपी महिला ज्या रिक्षात बसली होती.त्याला फोनवर घटनेबाबत थोडक्यात माहिती सांगितली. त्यानंतर रिक्षाचालकाने आरोपी महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवले. आरोपी वंदना हिला चंदननगर येथून अथक प्रयत्नानंतर ताब्यात घेतले आणि त्या महिलेची मुलगी त्यांच्या स्वाधीन केले. तसेच आरोपी महिला वंदना मल्हारी जेठे हिच्या कडे अधिक चौकशी केली असता. ही महिला पुण्यातील खराडी भागात राहणारी असून ती उच्चशिक्षित आहे.तिला अनेक वर्षापासून मूल होत नव्हते. त्यामुळे तिने मुलीला पळवल्याची कबुली दिल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT