Pune Crime: मुलीला त्रास देतो म्हणून तरुणाला मारहाण, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आपल्या मुलीला त्रास देत असल्याच्या आरोप करत मुलीकडच्या कुटुंबियांनी एका मुलाला बेदम मारहाण केली आहे. या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुण्याच्या शिवणे परिसरात ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

प्रद्युम्न प्रकाश कांबळे (वय २२) असं या मृत तरुणाचं नावं आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी मुलीला भेटायला गेलेला असताना मुलीच्या आईने प्रद्युम्नला जाब विचारला. यातून मुलीची आई वंदना पायगुडे आणि प्रद्युम्न यांच्यात वाद निर्माण होऊन बाचाबाची झाली. या रागात वंदना यांनी लाकडी दांडक्याने प्रद्युम्नला मारहाण करत जखमी केलं.

प्रद्युम्न यानंतर त्यांच्या तावडीतून सुटला होता. परंतू मुलीकडच्या लोकांनी पाठलाग करत दांगट पाटील नगर येथील रस्त्यावर त्याला पुन्हा मारहाण केली. प्रद्युम्नला मारहाण केल्यानंतर दोन व्यक्ती रिक्षातून पळून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली होती. प्रद्युम्नवर माळवडी येथील माई मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतू उपचारादरम्यान गुरुवारी प्रद्युम्नचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

तोतया PSI अधिकाऱ्याला पोलिसांनी केली अटक, लग्नासाठी मुलीला इम्प्रेस करायला केला होता खटाटोप

या घटनेनंतर वारजे पोलिसांनी संबंधित प्रकरणात प्रद्युम्नला मारहाण करणारी महिला, तिचा पती, मुलगा आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रद्युम्न हा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा मुलगा होता. कोथरुड परिसरात त्याच्यावर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान अटकेतील चारही आरोपींना न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ADVERTISEMENT

मुलगा होत नसल्यामुळे पत्नीवर रॉकेल टाकून पेटवलं, आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT