पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; चौघे जण जागीच ठार
बारामती : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अर्टिगा आणि बोलेरो दोन कार्सची समोरासमोर धडक होऊन चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर शहराच्या हद्दीत सरडेवाडी जवळ घडली. याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोलेरो गाडी मध्ये तीन प्रवासी प्रवास करीत होते. इंदापूर शहरातील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर व्यवहारे पेट्रोल पंपाजवळ अर्टिगा गाडीचा […]
ADVERTISEMENT
बारामती : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अर्टिगा आणि बोलेरो दोन कार्सची समोरासमोर धडक होऊन चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर शहराच्या हद्दीत सरडेवाडी जवळ घडली.
ADVERTISEMENT
याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोलेरो गाडी मध्ये तीन प्रवासी प्रवास करीत होते. इंदापूर शहरातील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर व्यवहारे पेट्रोल पंपाजवळ अर्टिगा गाडीचा टायर फुटला. ज्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी समोरून येणाऱ्या बोलेरो गाडीवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे गावचे अविनाश कुंडलिक पवार, गणेश पोपट गोडसे, आणि बाळासाहेब चांगदेव साळुंखे यांचा तर ज्योतीराम सूर्यभान पवार (अर्टिगा चालक) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन्ही गाड्या हटविल्या असून मृतांच्या पंचनामे करण्यासाठी इंदापूरच्या शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आले आहेत.
हे वाचलं का?
काय आहेत मृतांची नावं?
अविनाश कुंडलिक पवार
ADVERTISEMENT
गणेश पोपट गोडसे
ADVERTISEMENT
बाळासाहेब चांगदेव साळुंखे
ज्योतीराम सूर्यभान पवार
या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने आणि टायर फुटल्याने हा अपघात झाला. या घटनेत चार जण जागीच ठार झाले. या अपघातात अर्टिगा आणि बोलेरो या दोन्ही कार्सचा अक्षरशः चुराडा झाला आहे. त्यावरूनच ही टक्कर किती भीषण असेल याची कल्पना येते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT