Tauktae Cyclone Live: पुढील काही तास महत्त्वाचे, तौकताई चक्रीवादळाचं होणार ‘अत्यंत भीषण चक्रीवादळात’ रुपांतर
मुंबई: तौकताई चक्रीवादळ हे या क्षणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घोंघावत आहे. या चक्रीवादळचा केंद्रबिंदू हा सिंधुदुर्गच्या किनारपट्टीपासून फारच जवळच आहे. त्यामुळे येथे प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. याशिवाय मुसळधार पाऊस देखील बरसण्यास सुरुवात झाली आहे. पण आता या वादळाबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याने थोड्या वेळापूर्वीच अशी माहिती दिली आहे की, […]
ADVERTISEMENT
मुंबई: तौकताई चक्रीवादळ हे या क्षणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घोंघावत आहे. या चक्रीवादळचा केंद्रबिंदू हा सिंधुदुर्गच्या किनारपट्टीपासून फारच जवळच आहे. त्यामुळे येथे प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. याशिवाय मुसळधार पाऊस देखील बरसण्यास सुरुवात झाली आहे. पण आता या वादळाबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याने थोड्या वेळापूर्वीच अशी माहिती दिली आहे की, तौकताई चक्रीवादळाचं रुपांतर हे आता पुढील काही तासांमध्ये ‘अत्यंत भीषण चक्रीवादळा’त होणार आहे.
ADVERTISEMENT
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घोंघावणारं तोकताई चक्रीवादळ हे तीव्र स्वरुपाचं आहे. मात्र, येत्या काही तासांमध्ये हे चक्रीवादळ अधिक ताकद जमा करणार असल्याने त्याचं स्वरुप हे अती तीव्र स्वरुपाचं होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे.
Tauktae Cyclone: चक्रीवादळाची महाराष्ट्रात एंट्री, मालवण किनारपट्टीवर वाऱ्याचा तुफान वेग
हे वाचलं का?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार तौकताई चक्रीवादळ हे आता पुढील काही तासात अती तीव्र स्वरुपात बदलण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या हे वादळ उत्तर-पश्चिम दिशेने वाटचाल करत असून ते 18 मे रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे धडकण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र आणि किनारपट्टीत भागांमध्ये असणारी राज्यं हे चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी करत आहेत.
Currently the system is Severe Cyclonic Storm & very soon it is likely to become Very Severe Cyclonic https://t.co/DlnHvDhMb6 the intensity of the storm will increase, it is expected to become more sort of organized with clear spiral bands, possibly visible EYE & full structure. pic.twitter.com/sS8MEkJ7ll
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 15, 2021
Tauktae Cyclone : महाराष्ट्रातील या दोन जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसणार
ADVERTISEMENT
आयएमडीच्या मते, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या चक्रीवादळाची निर्मिती झाली. आता हे चक्रीवादळ पोरबंदर ते नलिया दरम्यान, गुजरात किनारपट्टीवर 18 मेच्या आसपास धडकणार आहे. हे 16 ते 18 मे दरम्यान हे चक्रीवादळ अत्यंत तीव्र स्वरुपात घोंघावत राहणार आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत कधीपर्यंत पोहचणार तौकताई चक्रीवादळ?
तौकताई वादळ हे 17 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुंबईच्या (Mumbai) आसपास पोहचणार आहे. त्यामुळे मुंबई आणि इतरच्या परिसरात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मात्र, या वादळाचा मुंबई आणि जवळच्या परिसराला फारसा फटका बसत नसल्याचं सध्या तरी दिसतं आहे. मुंबईची रचना ही खोबणीत आहे. त्यामुळे सहसा वादळ हे मुंबईवर धडकत नसल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. मात्र असं असलं तरीही प्रशासन या वादळाला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या दरम्यान तौकताई हे वादळ मुंबईहून पुढे सरकणार आहे.
Tauktae Cyclone: पाहा महाराष्ट्रात कोणत्या वेळी कुठे असणार चक्रीवादळ?
17 मे (सोमवार) संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास हे वादळ पालघर जिल्ह्यात पोहचणार आहे. त्यामुळे डहाणू (Dahanu), पालघर (Palghar) येथील किनारपट्टी भागातील गावांना आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आाला आहे. येथे समुद्र खवळण्याची शक्यताही अधिक आहे.
Cyclone म्हणजे काय? त्यांना नावं नेमकी कशी दिली जातात?
तौकताई वादळ सध्या आहे तरी कुठे?
तौकताई वादळ हे आता पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पोहचलं आहे. काल रात्रभर हे वादळ गोव्यात घोंघावत होतं. आता हे वादळ पूर्णपणे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पोहचलं आहे. सध्या हे वादळ मालवण, देवगड या किनारपट्टीच्या भागातून पुढे सरकत असल्याचं समजतं आहे. त्यामुळे या भागात अत्यंत जोरदार वारे वाहत असून मुसळधार पाऊस देखील बरसत असल्याचं समजतं आहे.
आता हळहळू हे वाद सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दिशेने पुढे सरकत असून ते थोड्याच वेळात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी व्यापून टाकणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वादळाचा सर्वाधिक फटका हा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच बसण्याची शक्यता अधिक आहे. कारण या भागातील किनारपट्टीच्या अगदी जवळून हे वादळ पुढे सरकरणार आहे. त्यामुळे इथे ताशी 100 ते 120 वेगाने वारे वाहणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT