लसीकरणाचे अधिकारी म्हणून घरात आले, मुद्देमाल लुटून पसार; अकोल्यातील धक्कादायक घटना
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या घरी आज चोरट्यांनी मुद्देमाल लुटून पोबारा केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे चोरटे आपण लस देणारे अधिकारी असल्याचं सांगून घरात घुसले आणि यानंतर त्यांनी मुद्देमाल लुटला. आरोपींनी यावेळी घरातला एक मोबाईल आणि रोखरक्कम चोरून नेल्याचं कळतंय. अकोट शहरात अरुण सेजपाल यांचं हार्डवेअरचं दुकान आहे. मंगळवारी आलेल्या चोरट्यांनी आपण […]
ADVERTISEMENT
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या घरी आज चोरट्यांनी मुद्देमाल लुटून पोबारा केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे चोरटे आपण लस देणारे अधिकारी असल्याचं सांगून घरात घुसले आणि यानंतर त्यांनी मुद्देमाल लुटला. आरोपींनी यावेळी घरातला एक मोबाईल आणि रोखरक्कम चोरून नेल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
अकोट शहरात अरुण सेजपाल यांचं हार्डवेअरचं दुकान आहे. मंगळवारी आलेल्या चोरट्यांनी आपण लसीकरणाचे अधिकारी असल्याचं सांगत सेजपाल यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी तुमच्या घरातल्यांचं लसीकरण झालं आहे का असं विचारल्यानंतर चोरट्यांनी घरातल्या वृद्ध दाम्पत्याला आणि एका लहान मुलीला मारहाण करत त्यांच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबला. यानंतर चोरट्यांनी या सर्वांना एका खोलीत कोंडलं आणि मुद्देमाल घेऊन ते पसार झाले.
काहीवेळाने मुलीने आपल्या तोंडातला कापसाचा बोळा काढण्यात यश मिळवलं आणि आरडाओरड करायला सुरुवात केली. परंतू तोपर्यंत चोरट्यांनी घटनास्थळावरुन पोबारा केला होता. या घटनेत सेजपाल दाम्पत्याला किरकोळ जखमा झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान अकोल्याचे पोलीस अधिक्षक श्रीधर यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. यावेळी सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस चोरट्यांचा शोध घेत असल्याचं अधिक्षक श्रीधर यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT