नागपूर : Corona नियमांचं उल्लंघन, एजंट जॅक पबवर कारवाई, ३० हजारांचा दंड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूरच्या उंटखाना मेडीकल चौकातील ट्रिलीयम मॉलमध्ये असलेल्या एजंट जॅक पब आणि बारवर नागपूर महापालिकेने कारवाई केली आहे. कोरोनाविषयक नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे नागपूर महापालिकेच्या पथकाने पोलीसांच्या मदतीने या पबवर कारवाई करत ३० हजारांचा दंड ठोठावला.

ADVERTISEMENT

२६ जूनला रात्री साडेनऊ वाजता ही कारवाई करण्यात आली. महापालिकेने अधिकारी ज्यावेळी कारवाईसाठी येथे पोहचले तेव्हा १०० पेक्षा जास्त तरुण तिकडे हजर होते. तसेच सोशल डिस्टन्सिंगचाही पूर्णपणे फज्जा उडालेला पहायला मिळाला. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बार मालकाने कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याचं लक्षात येताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत ३० हजारांचा दंड ठोठावला.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आलेली असली तरीही भविष्यात रुग्णसंख्या वाढू नये यासाठी शाससाने नियम आखून दिले आहेत. परंतू अनेक ठिकाणी या नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे. यापुढे नियमांचं पालन झालं नाही तर यापेक्षाही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT