अभिनेता आरोह वेलणकरचं सोशल मीडिया अकाऊंट झालं हॅक
सध्या अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी जोडलेले असतात. मराठमोठा अभिनेता आरोह वेलकरण देखील सोशल मीडियावर बऱ्यापैकी अक्टिव्ह असतो. तर नुकतंच अभिनेता आरोह वेलकरणचं फेसबूक अकाऊंट हॅक करण्यात आलंय. स्वतः आरोहने याबाबत माहिती दिलीये. आरोहच्या म्हणण्यानुसार, त्याला फेसबुकद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. दरम्यान आरोहनं याबाबत पुणे पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांचा सायबर गुन्हे विभाग […]
ADVERTISEMENT
सध्या अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी जोडलेले असतात. मराठमोठा अभिनेता आरोह वेलकरण देखील सोशल मीडियावर बऱ्यापैकी अक्टिव्ह असतो. तर नुकतंच अभिनेता आरोह वेलकरणचं फेसबूक अकाऊंट हॅक करण्यात आलंय. स्वतः आरोहने याबाबत माहिती दिलीये.
ADVERTISEMENT
आरोहच्या म्हणण्यानुसार, त्याला फेसबुकद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. दरम्यान आरोहनं याबाबत पुणे पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांचा सायबर गुन्हे विभाग या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने त्याचं फेसबूक अकाऊंट हॅक केल्याची माहिती दिलीये.
हे वाचलं का?
आरोहचा एक मॉर्फ व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडीयोद्वारे त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं आरोहने म्हटलंय. इतकंच नाही तर त्या अज्ञान व्यक्तीने आरोहला फोन करुन धमकी दिली. फेसबुकवरुनच त्याला नंबर मिळाला असावा अशी शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT