तामिळ अभिनेता विवेक यांचे निधन
मुंबई तक : तामिळ अभिनेता पद्मश्री पुरस्कार विजेते विवेकं यांचं रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू. हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या विवेक यांचं चेन्नईच्या हॉस्पिटलमध्ये पहाटे 4.45 निधन झालं. 16 एप्रिलला विवेक यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना एक्मो (ECMO) ट्रिटमेंट देण्यात येत होती. विवेक यांनी 15 एप्रिलला कोव्हिड व्हॅक्सिन […]
ADVERTISEMENT
मुंबई तक : तामिळ अभिनेता पद्मश्री पुरस्कार विजेते विवेकं यांचं रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू. हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या विवेक यांचं चेन्नईच्या हॉस्पिटलमध्ये पहाटे 4.45 निधन झालं. 16 एप्रिलला विवेक यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना एक्मो (ECMO) ट्रिटमेंट देण्यात येत होती.
ADVERTISEMENT
विवेक यांनी 15 एप्रिलला कोव्हिड व्हॅक्सिन घेतलं होतं. लस घेण्यासाठी विवेक त्यांच्या मित्राबरोबर ओमानदुरार इथल्या सरकारी रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांनी व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी त्यांनी सरकारी रुग्णालयात व्हॅक्सिन का घेतलं याची कारणं माध्यमांना सांगितली होती. सरकारी हॉस्पिटल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात असं मत त्यांनी यावेळी मांडलं होतं. तसंच यावेळी ते म्हणाले होते “कोव्हिड व्हॅक्सिन सेफ आहे. कोव्हिड व्हॅक्सिन घेतलं तर आपण आजारीच पडणार नाही असा विचार करू नका. आपल्याला त्यानंतरही काळजी घ्यावी लागणार आहे. व्हॅक्सिन घेतल्यामुळे कोव्हिडचा धोका पूर्वीपेक्षा कमी असेल.”
विवेक यांची अभिनेता आणि कॉमेडियन म्हणून ओळख होती. त्यांनी रजनीकांत, कमल हसन, माधवन, अशा मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं होतं. माधवन यांचा रन हा चित्रपट त्यांच्यासाठी मोठा ब्रेक ठरला होता. त्यांच्या चित्रपटातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री पूरस्कार देण्यात आला होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT