माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जातं आहे, वेळ आल्यावर मी पण पुरावे बाहेर काढेन-किरण माने

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजकीय पोस्ट केल्यामुळेच आपल्याला मुलगी झाली हो या स्टार प्रवाहवरील मालिकेतून काढून टाकण्यात आलं असा आरोप अभिनेते किरण माने यांनी केला आहे. त्यानंतर त्यांच्याविरोधात त्यांच्या मालिकेत सहकलाकार म्हणून काम करणाऱ्यांनी किरण माने गैरवर्तणूक करत असल्याचं म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

मालिकेतल्या कलाकारांमध्ये दोन गट पडल्याचं दिसून आलं. एका गटाचं म्हणणं आहे की किरण माने चांगले अभिनेते आहेत. तर काही कलाकार हे किरण माने सतत टोमणे मारून बोलतात, हेटाळणी करतात, गैरवर्तणूक करतात असं म्हणत आहेत. याबाबत आता किरण माने यांनी भाष्य केलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले आहेत किरण माने?

माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जातं आहे. सेटवरचं वागणं आपत्तीजनक होतं, चुकीचे शब्द वापरले ही सगळी कारणं दिली जात आहेत. मात्र ही कारणं ठरवून दिली जात आहेत. मी जर चुकीचं वर्तन केलं असतं इतर महिला कलाकार पुढे आल्या नसत्या असंही किरण माने यांनी म्हटलं आहे. आरोप करणाऱ्या एका महिला कलाकाराचे पती भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे या सगळ्यामागे राजकीय दहशतवाद आहे. सिनेसृष्टी, सीरियल विश्व यामध्ये कायमच बहुजन कलाकारांवर अन्याय होतो आहे. त्यामुळे त्याविरोधात मी लढणार आहे. माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जातं आहे मात्र माझ्याकडेही पुरावे आहेत मी वेळ आल्यावर बाहेर काढेन असंही किरण माने यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

मालिकेतून तडकाफडकी काढणं ही झुंडशाही, शरद पवारांच्या भेटीनंतर किरण माने यांची प्रतिक्रिया

ADVERTISEMENT

रविवारी किरण माने यांनी काय फेसबुक पोस्ट लिहिली?

आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्रॉडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू..मीडियावाले सेटवर जाणार आहेत…अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे… करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे ‘पोटार्थी’ हायेत. प्रॉडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे… चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते ‘सत्य’ सांगतीलच !

पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा !

मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी !

तुका म्हणे रणी…नये पाहो परतोनी !!!

– किरण माने.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT