रणबीर कपूरने दीड वर्षापासून खाल्ली नाही पोळी, ट्रेनरने उघड केला फिटनेसचा फंडा
रणबीर कपूर हा बॉलिवूडचा चॉकलेट बॉय आहे. रणबीर आणि आलिया या दोघांचं लग्न याच महिन्यात होणार आहे. त्यामुळे सगळेच जण रणबीर आणि आलियाबाबत अनेक गोष्टी माहिती करून घेत आहेत. या दोघांचाही त्यांचा असा चाहता वर्ग आहे. तरीही रणबीर कपूर आणि आलियाच्या आयुष्यात काय काय चाललं आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. अशात रणबीरचा फिटनेस […]
ADVERTISEMENT
रणबीर कपूर हा बॉलिवूडचा चॉकलेट बॉय आहे. रणबीर आणि आलिया या दोघांचं लग्न याच महिन्यात होणार आहे. त्यामुळे सगळेच जण रणबीर आणि आलियाबाबत अनेक गोष्टी माहिती करून घेत आहेत. या दोघांचाही त्यांचा असा चाहता वर्ग आहे. तरीही रणबीर कपूर आणि आलियाच्या आयुष्यात काय काय चाललं आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
ADVERTISEMENT
अशात रणबीरचा फिटनेस ट्रेनर शिवोहम (दीपेश भट्ट) याने आज तकला दिलेल्या मुलाखतीत रणबीरचा फिटनेस फंडा काय आहे ते सांगितलं आहे.
हे वाचलं का?
रणबीर कपूरचा अंदाज, त्याचं व्यक्तिमत्व हे अनेकांना भावतं. त्याचा लुक अनेकांना आवडतो. रणबीरची स्टाईल, लुक यामुळे त्याला ट्विटरवर फॉलोही केलं जातं. शिवोहम हा रणबीरचा फिटनेस ट्रेनर आहे. त्याने रणबीर कपूरचा फिटनेस फंडा सांगितला आहे. जाणून घेऊन शिवोहम अर्थात दीपेश भट्टने नेमकं काय सांगितलं?
ADVERTISEMENT
सेलिब्रिटी फिटनेस कोच शिवोहम (दीपेश भट्ट) क्रॉसफिट जिमचे फाऊंडर आणि सेलिब्रिटी ट्रेनर आहेत. अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा, अभिषेक बच्चन, आमिर खान या सगळ्यांना त्याने ट्रेनिंग दिलं आहे. २००३ मध्ये रिलिज झालेला सिनेमा कल हो ना हो यामध्ये शिवोहम DJ बेनी दयालचं पात्र साकारलं होतं.
ADVERTISEMENT
शिवोहमने सांगितलं की रणबीरला मी मागच्या दीड वर्षांपासून ट्रेनिंग देतो आहे. रणबीर स्वतःला फिट ठेवण्यासाठी मी ट्रेनिंग देतो आहे आणि तो देखील चांगला व्यायाम करतो आणि डाएटही काटेकोरपणे सांभाळतो. रणबीरचं डाएट अत्यंत काटेकोर आहे. दीड वर्षापासून मी रणबीरला ट्रेनिंग देतो आहे. लोकांना वाटत असेल रणबीरचं जेवण अत्यंत खास असेल, त्याच्या जेवणात व्हरायटी असेल. वेगवेगळे पदार्थ असतील. पण तसं नाही.. रणबीर गोड खात नाही. तो तळलेले पदार्थ खात नाही. तसंच बाहेरचं जेवणही रणबीर घेत नाही. रणबीर कपूर घरातलं साधं जेवण घेतो. गेल्या दीड वर्षांपासून त्याने पोळी खाल्लेली नाही. चीट डे असेल तेव्हाही रणबीर कपूर फक्त बर्गर खातो कारण त्याला बर्गर खूप आवडतो. मात्र एरवी तो स्वतःच्या जेवणाबाबत अत्यंत काटेकोर आहे.
आलिया भट्टसोबत लग्न कधी करणार?; रणबीर कपूर म्हणाला, ‘मला पिसाळलेलं कुत्रं चावलंय का?’
शिवोहम सांगतो रणबीर लोक कार्ब डाएट घेतो आहे. सकाळी ब्रेकफास्टमध्ये अंडं, प्रोटीन शेक घेतो. त्यानंतर दुपारच्या जेवणात ब्राऊन राईस, चिकन, डाळ आणि हिरवी भाजी असते. स्नॅक्स म्हणून तो ड्रायफ्रूट खातो. तसंच त्याचं डिनर हलक्या स्वरूपाचं असतं. रणबीरला पोळी-भाकरी आवडत नाही त्यामुळे त्याचा समावेश त्याच्या जेवणात नसतो. मागच्या दीड वर्षापासून त्याने पोळी खाल्लेली नाही. रणबीर कपूर प्रोटीन, ग्लुटामाइन आणि मल्टिविटामिन सप्लिमेंट घेतो असंही शिवोहमने सांगितलं.
शिवोहमने हेदेखील सांगतिलं की रणबीरचा फिटनेस जबरदस्त आहे एवढंच नाही तर तो रहावा म्हणून त्याचं डेडिकेशनही प्रचंड आहे. रणबीरला हे चांगलं माहित आहे की कॅमेरा छोट्यातली छोटी गोष्ट नजरेत पकडतं. रणबीर आठवड्यातले ६ दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग घेतो. त्यात कधी कधी फंक्शनल ट्रेनिंगही असतं. आठवड्यातला एक दिवसच तो आराम करतो असंही शिवोहमने सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT