इंडस्ट्रीतील बंदीनंतर अभिनेत्री गौहर खानची उलट प्रतिक्रिया
कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेत्री गौहर खान विरोधात मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केला होता. गौहरला कोरोनाची लागण झाली असताना देखील ती सार्वजिनक परिसरात फिरत असल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या सर्व प्रकरणानंतर गौहरच्या टीमकडून खुलासा करण्यात आला आहे. अभिनेत्री गौहर खानच्या टीमकडून अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. या स्टेटमेंटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेत्री गौहर खान विरोधात मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केला होता. गौहरला कोरोनाची लागण झाली असताना देखील ती सार्वजिनक परिसरात फिरत असल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या सर्व प्रकरणानंतर गौहरच्या टीमकडून खुलासा करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
अभिनेत्री गौहर खानच्या टीमकडून अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. या स्टेटमेंटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, गौहर खानची चौकशी आणि काळजी करण्याबद्दल धन्यवाद. गौहरचा लेटेस्ट रिपोर्ट झाला असून तिच्या तपासण्या निगेटिव्ह आल्या आहेत. गौहर नियमांचं पालन करणाऱ्या नागरिक असून मुंबई महानगर पालिकेच्या सर्व कायद्यांना ती सहकार्य करतेय. सर्वांना विनंती आहे की या तर्कवितर्कांना पूर्णविराम द्या.
हे वाचलं का?
गौहर सध्या कठीण काळातून जातेय. 10 दिवसांपूर्वी तिच्या वडिलांचं निधन झालं आहे. त्यामुळे हा तिच्यासाठी फार कठीण असून या काळात तिला सांभाळून घ्या, असंही स्टेटमेंटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
गौहर सध्या कठीण काळातून जातेय. 10 दिवसांपूर्वी तिच्या वडिलांचं निधन झालं आहे. त्यामुळे हा तिच्यासाठी फार कठीण असून या काळात तिला सांभाळून घ्या, असंही स्टेटमेंटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT