या अभिनेत्रीनं सांगितलं मनोरंजन इंडस्ट्रीतलं काळं सत्य; “दिग्दर्शक करायचे अशी मागणी की,…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री अनेकदा कास्टिंग काउचवर बोलताना दिसतात. अलीकडेच ‘ये रिश्ते है प्यार के’ अभिनेत्रीनेही यावर मोकळेपणाने बोलली आहे. ये रिश्ते हैं प्यार के मधील कुहूबद्दल आम्ही बोलत आहोत. या शोमध्ये कुहूची भूमिका कावेरी प्रियमने साकारली होती. ‘ये रिश्ते हैं प्यार के’ मधून कावेरीला घरोघरी ओळख मिळाली. पण तिचा अभिनय प्रवास वाटतो तितका सोपा राहिलेला नाही. इंडस्ट्रीत संघर्ष करत असताना कावेरीला कास्टिंग काउचलाही सामोरं जावं लागलं होतं, ज्याचा खुलासा तिने आता केला आहे.

ADVERTISEMENT

कावेरीने पदार्पणादरम्यानचा सांगितला किस्सा

कावेरी प्रियमने ‘ये रिश्ते हैं प्यार के’ या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या शोमध्ये तिने नकारात्मक व्यक्तिरेखा म्हणून स्वत:ची छाप पाडली. त्याच वेळी, ती आता ‘जिद्दी दिल माने ना’ मध्ये डॉ. मोनामीच्या भूमिकेत दिसत आहे. ‘ई टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत कावेरीने आपल्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलताना सांगितले की, पदार्पणापूर्वी तिला खूप त्रास सहन करावा लागला होता.

हे वाचलं का?

अभिनेत्री होण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून मुंबईला आल्याचं कावेरी सांगते. अभिनेत्री सांगते की मायानगरीत तिला रस्ता दाखवणारे कोणी नव्हते. ऑडिशन्स कुठे आणि कशा द्यायच्या हे सांगायला कुणीच नव्हतं. कावेरी सांगते की तिला अशा अभिनेत्रींबद्दल सांगण्यात आले ज्यांनी शॉर्टकट मार्ग स्वीकारला आणि खूप उंची गाठली.

तिने केला कास्टिंग काऊचचा सामना

ADVERTISEMENT

मुलाखतीत तिच्या मागील दिवसांची आठवण करून देताना कावेरी म्हणते की कास्टिंग डायरेक्टरने तिच्याकडे भलत्याचं गोष्टीची मागणी केली होती. त्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. कास्टिंग डायरेक्टरचे म्हणणे ऐकून कावेरीला मोठा धक्का बसला. ती सांगते की मी ऑटोमध्ये बसताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कावेरी म्हणते की, तिने अभिनेत्री होण्यासाठी खूप मेहनत केली. पण ती जेवढी मेहनत करत होती, तिला तितकीच वाईट वागणूक दिली जात होती.

ADVERTISEMENT

इतकेच नाही तर एकदा एका दिग्दर्शकाने कावेरीकडे ब्रेक देण्यासाठी पैशांची मागणीही केली होती. या सगळ्या गोष्टींनी ती खूप निराश झाली होती. यानंतर कुटुंबीयांना फोन करून तिने सर्व काही सांगितले. घरच्यांच्या समजावण्यावरून कावेरी पुन्हा उठली. दोन वर्षांच्या संघर्षानंतर कावेरीला ‘ये रिश्ते हैं प्यार के’मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि आज सगळे तिला ओळखतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT