लस घेण्यासाठी कोविड सेंटरमध्ये सुपरवाजयर : अभिनेत्री मीरा चोप्राने आरोप फेटाळले
एकीकडे राज्यात लसीच्या तुटवड्यामुळे सरकारला १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण बंद करावं लागलं. अनेक केंद्रांवर आजही लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना परत जावं लागत आहे. अशा परिस्थितीत मीरा चोप्रा नामक अभिनेत्रीने लस घेण्यासाठी ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये सुपरवायजर म्हणून काम करत असल्याचं ओळखपत्र बनवून घेतल्याचा प्रकार समोर आला होता. विरोधी पक्षांनी यावरुन ठाणे मनपाला धारेवर […]
ADVERTISEMENT
एकीकडे राज्यात लसीच्या तुटवड्यामुळे सरकारला १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण बंद करावं लागलं. अनेक केंद्रांवर आजही लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना परत जावं लागत आहे. अशा परिस्थितीत मीरा चोप्रा नामक अभिनेत्रीने लस घेण्यासाठी ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये सुपरवायजर म्हणून काम करत असल्याचं ओळखपत्र बनवून घेतल्याचा प्रकार समोर आला होता.
ADVERTISEMENT
विरोधी पक्षांनी यावरुन ठाणे मनपाला धारेवर धरल्यानंतर मीरा चोप्राने आपली बाजू मांडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारं ID card हे कोणी आणि कसं तयार केलं याची मलाही माहिती नाही. लस मिळवण्यासाठी मी महिन्याभरापासून प्रयत्न करत होते. लस घेण्यासाठी मला फक्त आधार कार्ड मागितलं होतं असं म्हणत मीरा चोप्राने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
हे वाचलं का?
जाणून घ्या काय म्हणाली आहे मीरा चोप्रा ?
ADVERTISEMENT
आपल्या सर्वांना लस हवी आहे आणि ती लस मिळावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. मी देखील गेल्या १ महिन्यांपासून माझ्या ओळखीतील काही व्यक्तींमार्फत मला लस मिळेल का या प्रयत्नात होते. यासाठी मला माझं आधारकार्ड मागितलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल होणारं ओळखपत्र हे माझं नाही. रजिस्ट्रेशनदरम्यान मला माझ्या आधार कार्डाची विचारणा झाली होती आणि रेकॉर्ड म्हणून मी तेच दाखवलं. कोणतही ओळखपत्र तुमच्या सहीशिवाय पूर्ण होत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेलं ते कार्ड मी देखील पहिल्यांदाच पाहते आहे. लस घेण्यासाठी अशा पद्धतीचा अवलंब करण्याच्या विरोधात मी आहे आणि हा प्रकार ज्याने कोणी केला आहे तो का केला हे मलाही जाणून घ्यायचं आहे.
ADVERTISEMENT
मीरा चोप्रा ही तामिळ, तेलगू सिनेसृष्टीत काम करते. मीरा चोप्राने ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाजा येथील कोविड सेंटरमध्ये सुपरवायजर म्हणून काम करत असल्याचं भासवत लस घेतली. महत्वाची गोष्ट म्हणजे मीराने आपण लस घेतानाचा फोटो ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत सर्वांना लस घेण्याचं आवाहनही केलं. परंतू ही बाब प्रसारमाध्यमांमध्ये समोर येताच तिने ही पोस्ट डिलीट केली आहे.
दरम्यान या प्रकरणावरुन आता ठाणे शहरातलं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीला कोविड सेंटरमध्ये सुपरवायजरचं ओळखपत्र कोणी बनवून दिलं? कोणत्या कारणासाठी दिलं याचा तपास व्हायला हवा अशी मागणी ठाणे मनपाचे भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. ठाणे महापालिकेनेही या प्रकरणाची दखल घेतली असून, उपायुक्त संदीप माळवी यांनी प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT