नागपुरात पकडलेला अफगाणी नागरिक तालिबान्यांना जाऊन मिळाला? व्हायरल झालेल्या फोटोमुळे पोलिसांची झोप उडाली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तालिबानी अतिरेक्यांनी अफगाणिस्तानातलं अशरफ घनी यांचं सरकार उलथवून लावत काबूलवर आपलं वर्चस्व निर्माण केल्यानंतर हाहाकार उडाला आहे. सध्या सर्व जगभरातील देशांच्या नजरा या अफगाणिस्तानकडे लागल्या असून एका व्हायरल फोटोमुळे नागपूर पोलिसांची झोप उडाली आहे. दोन महिन्यांपूर्वी नागपुरात सापडलेल्या नूर मोहम्मद या अफगाणी नागरिकाचे हातात बंदूक घेतलेल्याचे फोटो समोर आल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

ADVERTISEMENT

दोन महिन्यांपूर्वी नागपूर पोलिसांनी नूर मोहम्मद नावाच्या अफगाणी नागरिकाला ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडच्या कागदपत्रांची तपासणी केली असता तो अफगाणिस्तानचा नागरिक असून अवैध कागदपत्र आणि पासपोर्टच्या आधारावर तो भारतात आल्याचं निष्पन्न झालं. यानंतर नागपूर पोलिसांनी अफगाणिस्तानच्या दूतावासाशी संपर्क साधत नूर मोहम्मदची ओळख पटवून त्याला परत अफगाणिस्तानला रवाना केलं. परंतू अफगाणिस्तानात पोहचल्यानंतर नूर मोहम्मदचा बंदूक हातात घेतलेला फोटो समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे.

१६ जूनला नागपूर पोलिसांनी नूर मोहम्मदला ताब्यात घेतलं होतं. यावेळी तपासादरम्यान त्याच्या शरिरावर गोळी लागल्याचे काही निशाण होते. नूर मोहम्मदला अफगाणिस्तानात पाठवल्यानंतर तो तालिबान्यांशी जाऊन मिळाला अशी माहिती सध्या समोर येते आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बनावट कागदपत्राच्या आधारावर भारतात आलेला नूर मोहम्मद तब्बल १० वर्षांपासून नागपुरात राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई तक ने नागपूर पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेचे उपायुक्त बसवराज तेली यांच्याशी संपर्क साधला.

हे वाचलं का?

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हातात बंदूक घेतलेला फोटो हा नूर मोहम्मदचाच आहे याची खात्री नाहीये. त्या फोटोची सत्यता तपासण्यासाठीची कोणतीही यंत्राण पोलिसांकडे उपलब्ध नाहीये. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे याबद्दल कोणतीही खात्रीशीर माहिती देता येऊ शकत नाही. परंतू तो फोटो खरंच नूर मोहम्मद याचा असेल तर मात्र नागपूर पोलिसांसाठी ही डोकेदुखी ठरु शकते. १० वर्षांच्या काळात नूर मोहम्मद नागपूरमध्ये काय करत होता, त्याने कोणाशी संपर्क साधून काही अवैध कारवाया करण्याचा प्रयत्न केला का या सर्व गोष्टींचा तपास नागपूर पोलिसांना करावा लागणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT