‘माझे वडील आणि सर्वांचे नेते नाही राहिले’; मुलायमसिंहांच्या निधनानंतर अखिलेश यादव भावूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समाजवादी पक्षाचे (एसपी) संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते हरियाणातील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल होते. मुलायमसिंह यादव यांच्या निधनाने त्यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव भावूक झाले. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, माझे वडील आणि सर्वांचे नेताजी राहिले नाहीत.

ADVERTISEMENT

मुलायमसिंह यादव यांची प्रकृती गेल्या पाच दिवसांपासून नाजूक होती

माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी आज सकाळी 8.15 वाजता अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 22 ऑगस्ट रोजी त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 1 ऑक्टोबरच्या रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना CCU (क्रिटिकल केअर युनिट) मध्ये हलवण्यात आले. मुलायमसिंह यादव यांची प्रकृती गेल्या पाच दिवसांपासून नाजूक होती. आज त्यांचे निधन झाले आहे.

मुलायम सिंह यादव यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्यांचे पुत्र अखिलेश यादव मेदांता रुग्णालयात पोहोचले. गेल्या आठवडाभरापासून अखिलेश यादव सतत मेदांता हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते आणि मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत ते खूप चिंतेत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. सध्या संपूर्ण यादव कुटुंब मेदांता हॉस्पिटलमध्ये आहे.

हे वाचलं का?

5 दशकांची राजकीय कारकीर्द

  • – 1967, 1974, 1977, 1985, 1989, 1991, 1993 आणि 1996

  • – 8 वेळा आमदार होते.

  • ADVERTISEMENT

  • – 1977 ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये सहकार आणि पशुसंवर्धन मंत्री होते. ते लोकदल उत्तर प्रदेशचे अध्यक्षही होते.

  • ADVERTISEMENT

  • -1980 मध्ये जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष होते.

  • – 1982-85 – विधान परिषदेचे सदस्य होते. -1985-87 उत्तर प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते.

  • -1989-91 मध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

  • -1992 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना झाली. -1993-95- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

  • -1996- खासदार झाले

  • – 1996-98 – संरक्षण मंत्री होते.

  • – 1998-99 मध्ये पुन्हा खासदार म्हणून निवडून आले.

  • – 1999 मध्ये खासदार म्हणून तिसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले आणि सभागृहात सपाचे नेते बनले.

  • -ऑगस्ट 2003 ते मे 2007 पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.

  • – 2004 मध्ये चौथ्यांदा लोकसभेचे खासदार बनले -2007-2009 पर्यंत ते यूपीचे विरोधी पक्षनेते होते.

  • – मे 2009 मध्ये 5व्यांदा खासदार झाले.

  • – 2014 मध्ये सहाव्यांदा खासदार झाले

  • – 2019 पासून सातव्यांदा खासदार

  • ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT