Sharad Pawar पंतप्रधान मोदींनंतर आता Amit Shah यांच्या भेटीला, पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 3 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री आणि नवे सहकार मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये अचानक होणाऱ्या या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात मात्र वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. खरं तर मागील महिन्यात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. ज्याला काही दिवस उलटत नाही तोच पवार आता अमित शाह यांची भेट घेत आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची अमित शाह यांच्यासोबतची अधिकृत बैठक पूरग्रस्तांना मदत आणि एनडीआरएफच्या मदतीचे निकष बदलण्यात यावेत यासाठी असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, असं असलं तरी या बैठकीत या दोन दिग्गज नेत्यांमध्ये राजकीय चर्चा देखील होण्याची दाट शक्यता आहे.

राज्यात मागील दीड वर्षांहून अधिक काळ महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. तरु दुसरीकडे महाराष्ट्रासारख्या राज्यात आपण सत्तेत असावं यासाठी भाजपचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी शरद पवार यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या वाढलेल्या गाठीभेटी या बरेच प्रश्न उपस्थित करुन जात आहेत. त्यातही आत पवार हे भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह यांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा अधिकच रंगू लागल्या आहेत.

हे वाचलं का?

साधारण 15 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली होती. तर आता मात्र ते अमित शाह यांची भेट घेणार असल्याने सर्वांना या भेटीविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, अमित शाह हे देशाचे नवे सहकार मंत्री झाल्यापासून अशी एक चर्चा सुरु आहे की, या आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून अमित शाह राष्ट्रवादी काँग्रेसला वेगवेगळ्या प्रकारे शह देऊ शकतात. अशावेळी शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.

ADVERTISEMENT

शरद पवार आणि अमित शाह यांच्या ‘त्या’ भेटीची रंगली होती प्रचंड चर्चा

ADVERTISEMENT

काही महिन्यांपूर्वी शरद पवार आणि अमित शाह यांची अहमदाबादमध्ये अत्यंत गुप्त अशी भेट झाल्याची प्रचंड चर्चा रंगली होती. या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येक वेळी नकारच देण्यात आला. मात्र अमित शाह यांनी अशी भेट झाल्याचं नाकारलं नव्हतं. त्यांनी या गोष्टीला थेट नकार दिलेला नव्हता. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात त्याचे अनेक पडसाद उमटत होते.

असं असताना आता मात्र, शरद पवार हे थेटपणे अमित शाह यांच्या भेटीला जात आहेत. ज्यामुळे आता महाराष्ट्रात या भेटीचे नेमके काय परिणाम होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.

दुसरीकडे राजधानी दिल्लीत संसदेत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अशावेळी शरद पवार हे विविध नेत्यांच्या भेटी घेत आहेत. पण असं असलं तरीही भाजप नेत्यांशी त्यांच्या भेटीगाठी वाढल्या असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि नितीन गडकरी यांची देखील भेट झाली होती. स्वत: गडकरींनी पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

याशिवाय त्यांनी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पियुष गोयल या नेत्यांच्या देखील भेटी घेतल्या आहेत. पवारांच्या भाजप नेत्यांसोबतच्या वाढलेल्या या भेटींमुळे पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

अमित शाह आणि शरद पवार यांची कथित भेट आणि काही अनुत्तरीत प्रश्न

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर सारण्यासाठी शरद पवार यांनी आपल्या पक्षासह काँग्रेस आणि शिवसेनेला देखील एकत्र आणून सत्ता स्थापन केली. पण अस असलं तरीही शरद पवार यांचं आजवरचं एकूण राजकारण पाहता ते कोणत्या क्षणी काय निर्णय घेतील याबाबत कोणतीही शाश्वती देता येणार नाही. म्हणून त्यांच्या आजच्या भेटीकडे राज्यातील अनेक नेत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT