वडिलांच्या अटक प्रकरणानंतर MLA नितेश राणेंनी केली थेट ‘राष्ट्रपती राजवटी’ची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात आलं होतं. ज्यामुळे त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवेसना विरुद्ध राणे समर्थक असा वाद पेटला होता. युवा सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी राणेंच्या घराबाहेर प्रचंड राडा केला होता. याच राड्यावर आणि राणेंच्या अटकेनंतर त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी थेट राष्ट्रपती राजवटीचीच मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

काल (24 ऑगस्ट) मुंबईतील जुहू येथील राणेंच्या बंगल्याबाहेर युवा सेनेच्या नेत्यांनी तुफान राडा केला होता. यावेळी त्यांची भाजप कार्यकर्त्यांसोबत हाणामारी देखील झाली. या संपूर्ण कार्यकर्त्यांचं नेतृत्व हे युवा सेनेचे सचिव आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांनी केलं होतं.

ज्यानंतर वरुण सरदेसाई यांनी कालच संध्याकाळी युवासेनेच्या कोअर कमिटीसह मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीचा फोटो देखील शिवसेनेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केला होता.

हे वाचलं का?

युवा सेनेच्या या फोटोवर नितेश राणेंनी आक्षेप घेतला. हे सगळे गुंड प्रवृत्तीचे आहेत असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट देखील केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे.

पाहा नितेश राणे यांचं नेमकं ट्विट काय:

ADVERTISEMENT

‘हा तर एक प्रकारचा पश्चिम बंगालसारखा राज्य पुरस्कृत राडा होता. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुरक्षिततेचा विचार करायला हवा होता. पण त्यांनी अशा गुंड प्रवृत्तींना पाठिंबा देत राडा करणाऱ्यांचाच सत्कार केला आहे. ही आहे महाराष्ट्रातील परिस्थिती. या ठगांपासून राज्यात सुरक्षितता निश्चित करण्यासाठी आता फक्त राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे.’ असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

राणेंच्या घराबाहेर शिवसेना आणि भाजपमध्ये का झाला होता राडा?

नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला आव्हान दिलं होतं की, ‘सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका.’ ज्यानंतर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर धडक दिली होती.

येथे पोहचताच शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते. दुसरीकडे नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर भाजपचे देखील अनेक कार्यकर्ते होते. त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. यावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली होती.

Anil Parab: ‘पोलीस फोर्स वापरा’, परबांचा ‘तो’ Video व्हायरल, राणेंच्या अटकेतील इंटरेस्टिंग स्टोरी!

दरम्यान, येथील परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी राडेबाजांवर जोरदार लाठीहल्ला केला. त्यानंतर दोन्ही बाजूंकडील कार्यकर्त्यांना पांगविण्यात आलं. याचवेळी अनेकांनी नितेश राणे यांनी बंगल्याबाहेर यावं असं आव्हान देखील दिलं. या सगळ्यामुळे जुहू परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT