वादानंतर SBI ने बदलले नियम, 3 महिन्यांची गर्भवती महिला नोकरीसाठी ठरवल्या जात होत्या ‘अनफिट’
मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने गर्भवती महिला उमेदवारांच्या भरतीसंदर्भात नियमांमध्ये अलीकडेच केलेल्या बदलांची अंमलबजावणी थांबवली आहे. बँकेने यापूर्वी भरती नियमांमध्ये बदल करताना तीन महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या गर्भवती महिलांना ‘तात्पुरते अनफिट’ म्हणून घोषित केले होते. तसेच प्रसूतीनंतर चार महिन्यांच्या आत गर्भवती महिलांना बँकेत रुजू होऊ शकतात, असेही बँकेने म्हटले होते. या निर्णयामुळे देशातील या […]
ADVERTISEMENT
मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने गर्भवती महिला उमेदवारांच्या भरतीसंदर्भात नियमांमध्ये अलीकडेच केलेल्या बदलांची अंमलबजावणी थांबवली आहे. बँकेने यापूर्वी भरती नियमांमध्ये बदल करताना तीन महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या गर्भवती महिलांना ‘तात्पुरते अनफिट’ म्हणून घोषित केले होते.
ADVERTISEMENT
तसेच प्रसूतीनंतर चार महिन्यांच्या आत गर्भवती महिलांना बँकेत रुजू होऊ शकतात, असेही बँकेने म्हटले होते. या निर्णयामुळे देशातील या सर्वात मोठ्या बँकेवर प्रचंड टीका सुरु होती. कामगार संघटना आणि दिल्ली महिला आयोगानेही बँकेच्या या निर्णयावर टीका केली होती.
एसबीआयने जारी केले निवेदन
हे वाचलं का?
SBI ने शनिवारी एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, ‘SBI ने अलीकडेच बँकेतील नियुक्तीशी संबंधित विविध फिटनेस मानकांचे पुनरावलोकन केले. त्यात गर्भवती महिला उमेदवारांशी संबंधित नियमांचाही समावेश होता. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश आरोग्याच्या विविध पॅरामीटर्सवर काही प्रकारची स्पष्टता प्रदान करणे हा होता. जिथे मार्गदर्शक तत्त्वे एकतर स्पष्ट नव्हती किंवा ती खूप जुनी होती.’
बँकेने म्हटले आहे की, नियमांमध्ये अलीकडील बदल हे महिलांविरुद्ध भेदभाव करणारे असल्याचे काही मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळालं आहे. एसबीआयने निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘…लोकांच्या भावना लक्षात घेऊन, एसबीआयने गर्भवती महिलांच्या भरतीबाबत नियमांमध्ये केलेल्या बदलांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. आणि यासंदर्भातील पूर्वीच्या सूचना लागू राहतील.’
ADVERTISEMENT
SBI बँकेतील 25% महिलांचे म्हणणे आहे की, ती नेहमीच आपल्या महिला कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी सक्रिय असते. बँकेच्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या आता 25 टक्के झाली आहे.
ADVERTISEMENT
खाते एकत्रीकरण आराखड्यामुळे खातेदारांना सेवा निवडीचे पर्याय मिळतील -निर्मला सीतारामन
बँकेने म्हटले आहे की, कोव्हिड-19 च्या काळात, सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली होती आणि त्यांना कार्यालयात जाण्यापासून सूट देण्यात आली होती.
दरम्यान, आता बँकेने नियमात बदल केल्याने अनेक महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नियम बदलांमुळे भरतीसाठी पात्र असणाऱ्या महिलांना अडचणीचा सामना करावा लागला होता. मात्र, आता त्यांची अडचण दूर होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT