अहमदनगर : रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला अटक
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून आरोग्य यंत्रणेवर चांगलाच ताण आला आहे. अनेक शहरात रेमडेसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अनेक ठिकाणी इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या घटना घडत आहेत. अहमदनगरमध्ये इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ६ रेमडेसिव्हीर इंजेक्शन एक चारचाकी गाडी आणि एक बाईक असा ११ […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून आरोग्य यंत्रणेवर चांगलाच ताण आला आहे. अनेक शहरात रेमडेसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अनेक ठिकाणी इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या घटना घडत आहेत. अहमदनगरमध्ये इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ६ रेमडेसिव्हीर इंजेक्शन एक चारचाकी गाडी आणि एक बाईक असा ११ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ADVERTISEMENT
अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींविरोधात शनीशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी इंजेक्शनची कमतरता जाणवत असताना काळाबाजार करणारी एक टोळी ३५ हजार रुपयाला एक इंजेक्शन विकत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक तयार करुन आरोपीला नेवासा तालुक्यात वडाळा बहीरोबा या ठिकाणी बोलावलं.
यातील रामहरी घोघचोर या आरोपीची पोलीस अधिकारी बनावट ग्राहक बनून संपर्कात होते. ठरलेल्या ठिकाणी गुन्हे शाखेने सापळा रचला होता. इंजेक्शन घेऊन ही टोळी आल्यानंतर पोलिसांनी योग्य वेळ साधत यातील ४ आरोपींचा अटक केली असून १ आरोपी फरार झाला आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत असून आरोपींचे कोणत्याही हॉस्पिटल किंवा मेडीकल एजन्सीशी लागेबांधे आहेत का याचा तपास सुरु आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT