अजित पवार – राजकारणातील ‘दादा’ : खासदार ते विरोधी पक्ष नेते व्हाया उपमुख्यमंत्री
राजकारणातील ‘दादा’ म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांच्या खांद्यावर सध्या विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील राजकारणावर चांगली पकड असलेला नेता म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. मात्र ही ओळख त्यांना सहज नक्कीच मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि काका शरद पवार यांच्या सावलीत राहून देखील स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात ते आज यशस्वी ठरले आहेत. […]
ADVERTISEMENT
राजकारणातील ‘दादा’ म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांच्या खांद्यावर सध्या विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील राजकारणावर चांगली पकड असलेला नेता म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. मात्र ही ओळख त्यांना सहज नक्कीच मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि काका शरद पवार यांच्या सावलीत राहून देखील स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात ते आज यशस्वी ठरले आहेत. हीच ओळख त्यांनी नेमकी कशी मिळवली हे पाहणं गरजेचं आहे.
ADVERTISEMENT
खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेते असा अजित पवारांचा प्रवास राहिला आहे.
अजित पवार यांची कौटुंबिक माहिती :
अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील ‘देवळाली-प्रवरा’ गावी त्यांच्या आजोळी झाला. शरद पवारांचे मोठे भाऊ आणि अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार हे व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टूडिओमध्ये नोकरीला होते.
हे वाचलं का?
अजित पवार यांचा विवाह राजकीय नेते पद्मसिंह पाटील यांच्या बहिण सुनेत्रा यांच्याशी झाला. त्यांना पार्थ आणि जय अशी दोन आपत्यं आहेत. तर अजित पवारांची चुलत बहीण आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे ह्या सुध्दा राजकारणात चांगली कामगिरी बजावत आहेत.
अजित पवार यांची शैक्षणिक माहिती :
सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या अजित पवारांचे आयुष्य सुरुवातीला हालाखीच्या परिस्थितीतून गेलं. त्यांचं शालेय शिक्षणही आजोळी – देवळाली प्रवरा येथे झाले. दहावीनंतरच्या शिक्षणासाठी ते मुंबईत काका शरद पवार यांच्याकडे आले. तोपर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दी बहरत होती. मुंबईत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. मात्र वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर शिक्षण सोडुन त्यांना पुन्हा बारामतीला परतावं लागलं. इथं आल्यावर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
ADVERTISEMENT
अजित पवार यांची राजकीय माहिती :
बारामतीमध्ये परतल्यावर १९८२ साली अजित पवार यांची पॉलिटिकल इनिंग सुरु झाली. साखर कारखाना, सहकारी संस्थांच्या निवडणुकीत त्यांची राजकारणात एन्ट्री झाले. त्यावर्षी ते सहकारी साखर कारखान्याच्या मंडळावर निवडुन आले. सहकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. पुढे १९९१ मध्ये संसदीय राजकारणाला प्रारंभ केल्यानंतर आजतागायत त्यांनी सहकारी संस्थांच्याच राजकारणावर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे.
ADVERTISEMENT
१९९१ साली अजित पवार पुणे जिल्हा सहकारी बँकेवर निवडून गेले. ते बँकेचे अध्यक्षही झाले. पुढचे जवळपास १६ वर्ष ते सातत्याने बँकेच्या अध्यक्षपदी राहिले. त्याचवर्षी ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. मात्र शरद पवार यांना मुख्यमंत्री सोडून केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून जावं लागल्याने अजित पवार यांनी त्यांच्यासाठी राजीनामा देऊन मतदारसंघ रिकामा करुन दिला. त्याचवेळी शरद पवार यांच्या विधानसभेच्या जागी अजित पवार विधानसभेवर निवडून गेले.
पुढे अवघ्या दिवसातचं त्यांच्याकडे राज्याचे मंत्री म्हणून जबाबदारी आली. ते जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२ आणि नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ या दरम्यान ते कृषी, फलोत्पादन, जलसंधारण, ऊर्जा, नियोजन अशा खात्याचे राज्यमंत्री झाले. त्यानंतर अजित पवार यांनी मागं वळून पाहिलं नाही. १९९१ ते आजपर्यंत ते बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांना राज्यातील सर्वाधिक मताधिक्याचा इतिहास घडविणारे नेते म्हणून ओळखलं जातं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल १ लाख ६५ हजार मतांच्या मताधिक्याने अजित पवार निवडून आले आहेत.
या दरम्यान १९९५ ते १९९९ हा काळ युतीचे शासन सत्तेत होते. तो अपवाद वगळता १९९९ पासून २०१४ पर्यंत अजित पवार यांनी सातत्याने विविध खात्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली. ते राज्याचे उपमुख्यमंत्रीही झाले. काँग्रेस, भाजप आणि शिवसेना अशा राज्यातील तिन्ही प्रमुख पक्षांच्या मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी अजित पवार यांना मिळाली. २०१० पासून काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री होते.
एक फसलेलं बंड :
त्यानंतर २०१९ साली शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. हे सरकार अत्यंत आश्चर्यकारकरित्या सत्तेत आलं होतं. फडणवीस-पवार यांनी सकाळी महाराष्ट्र जागा होतं असतानाच शपथविधी उरकून देशाला राजकीय धक्का दिला होता. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे हे सरकार अवघं तीन दिवस टिकलं.
महाविकास आघाडी सरकार :
त्यानंतर महाविकास आघाडीच सरकार सत्तेत येऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. याच सरकारमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली. ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर त्यांच्याकडे राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून जबाबदारी आली.
अजित पवार आणि वाद :
अजित पवार यांना त्यांच्या स्पष्टवक्ते आणि फटकळ बोलण्यामुळेही ओळखलं जातं. यामुळे ते अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमध्ये अडकलेले पाहायला मिळतं. मात्र त्यानंतर तेवढ्याच तत्परतेने दिलगीरीही व्यक्त करतात. एकदा एका वक्तव्यामुळे वादात अडकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आत्मक्लेश उपोषण केलं होतं.
राजकीय प्रवास सुरुवातीपासून ते आतापर्यंत…
संसदीय राजकारण :
-
१७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१. (लोकसभा सदस्य)
-
१९९१ ते १९९५ (विधानसभा सदस्य)
-
नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ – राज्यमंत्री, जलसंधारण, उर्जा आणि नियोजन
-
२८ जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२ – राज्यमंत्री, कृषी, फलोत्पादन आणि उर्जा
-
१९९५ ते १९९९ – विधानसभा सदस्य
-
१९९९ ते २००४ – विधानसभा सदस्य
-
२७ ऑक्टोबर १९९९ ते २५ डिसेंबर, २००३ – मंत्री, पाटबंधारे (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन
-
२००४ ते २००९ – विधानसभा सदस्य
-
२६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ – मंत्री, ग्रामविकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे महामंडळे)
-
नोव्हेंबर २००९ – विधानसभा सदस्य
-
९ नोव्हेंबर, २००४ ते ७ नोव्हेंबर, २००९ – मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता
-
७ नोव्हेंबर, २००९ ते ९ नोव्हेंबर, २०१० – मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), ऊर्जा
-
११ नोव्हेंबर २०१० ते २९ सप्टेंबर २०११४ उपमुख्यमंत्री (वित्त आणि नियोजन, ऊर्जा)
-
ऑक्टोबर २०१४ – विधानसभा सदस्य
-
ऑक्टोबर २०१९ – विधानसभा सदस्य
-
नोव्हेंबर २०१९ ते जून २०२२ – उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
-
जुलै २०२२ ते आजपर्यंत – विरोधी पक्ष नेते
सहकारी आणि इतर संस्थांमध्ये भुषविलेली पद :
-
विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती
-
संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता. इंदापूर
-
संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि., भवानीनगर, माळेगाव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, लि., जिल्हा पुणे
-
संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मुंबई
-
संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट पुणे
-
अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
-
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई
-
संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध उत्पादक संघ
-
अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ
-
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन
-
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT