मुंबईकरांनो Mall मध्ये जाण्याचा प्लान करताय? मग ही बातमी वाचाच !
एकीकडे मुंबई शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महापालिका प्रशासनासमोर चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. महापौर किशोरी पेडणेकर यांनी शहरात आता रात्रीची संचारबंदी लागू करण्याची गरज असल्याचंही म्हटलंय. महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग मुंबईकरांनी काळजी घेण्याचं आवाहन करत असलं तरीही अनेक भागांमध्ये लोकांकडून नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत महापालिका प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक […]
ADVERTISEMENT
एकीकडे मुंबई शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महापालिका प्रशासनासमोर चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. महापौर किशोरी पेडणेकर यांनी शहरात आता रात्रीची संचारबंदी लागू करण्याची गरज असल्याचंही म्हटलंय. महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग मुंबईकरांनी काळजी घेण्याचं आवाहन करत असलं तरीही अनेक भागांमध्ये लोकांकडून नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत महापालिका प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे मुंबईतील मॉलमध्ये Rapid Antigen Test केंद्र सुरु करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
“मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने चिंताजनक वाढ होते आहे. २२ मार्चपासून मुंबईतील प्रत्येक मॉलमध्ये स्वॅब कलेक्शन सेंटर आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट Facility सुरु करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मॉलच्या व्यवस्थापनापैकी एक टीम या कामासाठी नेमावी लागणार आहे. याविषयी अधिकचं प्लानिंग आम्ही करत आहोत.” महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना माहिती दिली.
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “कोरोनाची लक्षणं दिसत नसलेला एखादा व्यक्ती जेव्हा मॉलसारख्या गर्दीच्या ठिकाणी जातो आणि त्याच्या मार्फत जेव्हा विषाणूचा प्रादुर्भाव होतो अशावेळी त्या व्यक्तीचा शोध घेणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे मॉलमध्ये यायच्या आधी लोकांनी आपण कोरोना निगेटीव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवावा किंवा मग स्वॅब टेस्टसाठी तयार रहावं.”
हे वाचलं का?
मुंबईत लॉकडाऊनबद्दल महापौरांचं महत्वाचं विधान, म्हणाल्या…
महापौर किशोरी पेडणकेर यांनी मुंबईत रात्रीच्या संचारबंदीचे संकेत दिले असले तरीही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते मुंबईत लॉकडाउन किंवा संचारबंदी हा पर्याय नाहीये. याऐवजी बस स्टॉप, पब्लिक पार्किंग लॉट, खाद्यपदार्थांच्या दुकानाबाहेरील गर्दीवर कडक लक्ष ठेवण्याची गरज आहे. मुंबईत गुरुवारी २ हजार ८७७ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण कसं ठेवायचं हा प्रश्न प्रशासनाला सतावतो आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT