शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित अडचणीत; १६ बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप
मोहम्मद हुसेन खान, पालघर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राजेंद्र गावित अडचणीत आले आहेत. गावित यांनी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १६ बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात मुंबईतील उद्योग क्रांती केंद्र या संस्थेचाही सहभाग असल्याचं आरोप आहे. त्यामुळे गावित यांच्यासह या संस्थेचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, खासदार गावित यांनी हे सर्व […]
ADVERTISEMENT
मोहम्मद हुसेन खान, पालघर
ADVERTISEMENT
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राजेंद्र गावित अडचणीत आले आहेत. गावित यांनी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १६ बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात मुंबईतील उद्योग क्रांती केंद्र या संस्थेचाही सहभाग असल्याचं आरोप आहे. त्यामुळे गावित यांच्यासह या संस्थेचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, खासदार गावित यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे, हे सर्व मला बदनाम करण्यासाठी सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
फसवणूक झालेल्या महिलांनी सांगितल्याप्रमाणे, पालघर जिल्ह्यातील तब्बल ८०० बेरोजगारांना स्वंय रोजगारनिर्मितीसाठी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नगरपरिषद आणि नगरपंचायत हद्दीतील कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कामगारांना, वीटभट्टी आणि इतर व्यवसाय करणाऱ्या बेरोजगारांसाठीही या योजनेचा लाभ येईल, असे सांगण्यात आले. लाभार्थ्यांना खासदार राजेंद्र गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २४ जुलै रोजी टेम्पो सेवा, फळभाजी विक्री, खाद्यपदार्थ अशा एकूण ५ प्रकारच्या वाहनांचा लाभ देण्यात येणार होता. वाहनांसोबतच ५० लाखांपर्यंतचे कर्जही देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
हे वाचलं का?
या योजनेसाठी जून महिन्यात मुंबईतील अंधेरी येथील उद्योग क्रांती केंद्राच्या हर्षदा सारथी यांनी जिल्ह्यातील बेरोजगारांना संपर्क करुन गावित यांच्या वाढदिवसादिवशी व्यावसायिक वाहनांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच यासाठी काही कादगपत्रे आणि एकूण रक्कमेच्या ५ टक्के रक्कम म्हणजे ३३ हजार रुपये लाभार्थ्यांना भरावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. शासकीय योजनेतून वाहने मिळतील आणि हाताला काम मिळेल या आशेवर असलेल्या तरुणांनी योजनेतील पाच टक्के रक्कम भरण्याची तयारी दाखविली. ही रक्कम भरण्यासाठी संबंधितांनी छोट्या बँकांकडून कर्ज स्वरूपात किंवा उसनवरी करुन ती या योजनेसाठी लावली. प्रातिनिधीक स्वरुपात ग्रामीण भागातील एकूण १६ लाभार्थ्यांकडून उद्योग क्रांती केंद्र या संस्थेच्या नावावर ही रक्कम जमा करून घेण्यात आली.
परंतु २४ जुलै २०२२ रोजी खासदार गावित यांच्या पालघर येथील घरासमोर काही वाहने उभी करुन लाभार्थ्यांना गाड्यांच्या चाव्या व मंजुरी पत्रके देण्यात आली. मात्र फोटोसेशन होताच चाव्या परत घेण्यात आल्या आणि आठ दिवसांनंतर वाहने दिली जातील, असे आश्वासन देण्यात आले. परंतु आज तीन महिने उलटले तरी अद्याप एकाही लाभार्थ्याला वाहन दिलेले नाही. यासंदर्भात उद्योग केंद्राच्या हर्षदा सारथी यांच्याशी संपर्क केला असता त्या फोन उचलत नाहीत, असा आरोप बेरोजगार तरुणांनी केला आहे. तसेच हाती काहीच न लागल्याने हवालदिल झाले हे तरुण आता संताप व्यक्त करत आहेत. अश्विनी पवार, शिल्पा हिवाळे, श्रद्धा जाधव, सुष्मिता भंडारी, राजेंद्र भोईर, अमित तामोरे अशी फसवणूक झालेल्या बेरोजगारांची नावं आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT