हापूस आंब्याच्या पेटीला ४० हजार ५०० चा उच्चांकी दर, कोल्हापूर बाजार समितीमध्ये पहिला सौदा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात आज हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीचा सौदा पार पडला. या सौद्यात ५ डझन हापूस आंब्याच्या पेटीला ४० हजार ५०० रुपयांची बोली लावण्यात आली आहे. कोल्हापूर बाजार समितीतला हा उच्चांकी दर मानला जात आहे. यंदाच्या हंगामाच्या मुहुर्ताच्या सौद्यात एक आंबा हा सुमारे ६७५ रुपयाला पडला आहे.

ADVERTISEMENT

कोल्हापूर बाजार समितीत आज हापूस आंब्याच्या पेट्या यायला सुरुवात झाली आहे. फळ मार्केट मधील तीन अडत दुकानात पाच डझनाची प्रत्येकी एक-एक पेटी आली होती. सुरुवातीला यासीन बागवान यांच्या अडत दुकानात सौदा काढण्यात आला. या ठिकाणी पेटीला २८ हजार ५०० रुपये दर मिळाला. जयवंत वळूंज यांनी ही पेटी खरेदी केली. दुसरा सौदा इकबाल मेहबुब बागवान यांच्या अडत पेटीवर निघाला.

हे वाचलं का?

दुसऱ्या सौद्यात आंब्याच्या पेटीला ३१ हजार ५०० रुपये दर मिळाला. गणेश वळंजू यांनी ही पेटी खरेदी केली, तर तिसऱ्या पेटीचा लिलाव बालम बागवान यांच्या पेढीवर काढण्यात आला. या ठिकाणी पाच डझनाच्या एका पेटीचा उच्चांकी दर, चाळीस हजार पाचशे रुपये इतका लागला. ४० हजार ५०० रुपये हा कोल्हापूर बाजार समितीमधला आत्तापर्यंत उच्चांकी दर मानला जात आहे. यामुळे आंब्याच्या एका फळाचा भाव ६७५ रुपये झाला आहे.

ADVERTISEMENT

कोकणतील देवगड कुंभार मठ इथल्या सचिन गोवेकर आणि सुहास गोवेकर यांच्या बागेतील आंबा होता उच्चांकी दर मुळे आगामी काळात आंबा विक्री चेक कोल्हापूर प्रमुख केंद्र होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावेळी प्रशासक मंडळाचे सदस्य डी जे भास्कर, जालंदर पाटील, नामदेव ढेरे, के बी पाटील, वसंत पाटील ,सचिव जयवंत पाटील यांच्यासह व्यापारी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते

ADVERTISEMENT

शेतीसाठी होणार होमिओपॅथी औषधांचा वापर, बारामती कृषी विज्ञान केंद्रात अनोखा प्रयोग

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT