उप-मुख्यमंत्री म्हणून वसुली करायला बसलोय का? जनता दरबारात जेव्हा Ajit Pawar संतापतात
उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचा रोखठोक स्वभाव सर्वांना माहिती आहे. अनेकदा आपल्या या स्वभावामुळे अजित पवार अडचणीतही आले आहेत. बारामती मतदार संघात जनतेच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आयोजित केलेल्या जनता दरबारात आज अजितदादांचा रोखठोक अंदाज उपस्थितांना पहायला मिळाला. एका ठिकाणी पैसे अडकले आहेत अशी तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीला अजितदादांनी मी काय वसुली करायला बसलोय का असं सुनावलं. […]
ADVERTISEMENT
उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचा रोखठोक स्वभाव सर्वांना माहिती आहे. अनेकदा आपल्या या स्वभावामुळे अजित पवार अडचणीतही आले आहेत. बारामती मतदार संघात जनतेच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आयोजित केलेल्या जनता दरबारात आज अजितदादांचा रोखठोक अंदाज उपस्थितांना पहायला मिळाला. एका ठिकाणी पैसे अडकले आहेत अशी तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीला अजितदादांनी मी काय वसुली करायला बसलोय का असं सुनावलं.
ADVERTISEMENT
जनता दरबारात अजित दादा बारामतीमधील लोकांच्या समस्यांचं निवारण करण्याचा प्रयत्न करत असतात. एका बहाद्दराने अजित दादांकडे चक्क एका व्यक्तीकडे अडकलेले पैसे वसुली करण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली, ज्याचा अजितदादांनी नंतर चांगलाच समाचार घेतला.
यावेळी उपस्थित लोकांना अजित पवारांनी आपल्या खास शैलीत सल्ला दिला. “लोकांनी आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावाव्यात, नको ती कामं घेऊन माझ्याकडे येऊ नका. मुलांना चांगले संस्कार द्या. हे सगळं करत असताना कोणी चुकीचं वागलं ना, सावकारी असो, रुपये शेकडा असे धंदे करणाऱ्यांना मी सोडणार नाही. कितीही मोठ्या बापाचा असो, मोक्का लावेन, तडीपार करेन. त्यामुळे जे कोणी बगलबच्चे असतील त्यांना सांगा असं काही करायच्या भानगडीत पडू नका.” याचसोबत पैशांची गुंतवणूक किंवा व्यवहार करताना वेड्यावाकड्या सवयी असणाऱ्या लोकांच्या नादी लागू नका असाही सल्ला अजित पवारांनी दिला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT