निव्वळ ‘या’ एका गोष्टीसाठी सचिन वाझेंकडून एवढा गंभीर गुन्हा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: पैसा आणि प्रसिद्धी या गोष्टींची चटक ही माणसाला कोणत्याही थराला घेऊन जाऊ शकते असं नेहमी म्हटलं जातं. पण प्रसिद्धीसाठी एखाद्या जबाबदार पदावरील व्यक्ती गंभीर गुन्हा देखील करु शकतो असं क्वचितच पाहायला मिळतं. होय… आपण ज्याबद्दल विचार करत आहात त्याचविषयी आम्ही आपल्याला सांगणार आहोत. ते म्हणजे NIAच्या अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंविषयी. पण त्याआधी काहीशी पार्श्वभूमी जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

ADVERTISEMENT

अँटेलिया बाहेरील संशयित कार प्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. NIA च्या आतापर्यंतच्या चौकशीत असं समोर आलं आहे की, अँटेलियाबाहेर जी कार ठेवण्यात आली होती ती सचिन वाझे यांनीच ठेवली होती. पण आता NIAला असा प्रश्न पडला आहे की, एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने असं का केलं असावं? याचं उत्तर NIAने सचिन वाझेंकडून जाणून घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर हे हादरवरुन सोडणारं आहे.

NIAच्या खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांनी हे संपूर्ण प्रकरण फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलं असल्याचं त्यांनी NIA ला सांगितलं आहे.

हे वाचलं का?

…Sachin Vaze हा विषय संपलेला नाही

प्रसिद्धीसाठी सचिन वाझेंनी केला एवढा गंभीर गुन्हा?

ADVERTISEMENT

NIA सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार वाझे यांनी हा प्रकार स्वतःची गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी केला. 2004 मध्ये ख्वाजा युनूसचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यूच्या आरोपानंतर वाझे यांनी निलंबित करण्यात आलं होतं. 2004 ते 2020 या काळात तब्बल 16 वर्ष ते निलंबित होते.

ADVERTISEMENT

2007 मध्ये वाझेंनी राजीनामा दिला पण तो तेव्हा मंजूर करण्यात आला नव्हता आणि वाझेंना निलंबितच ठेवण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात वाझे यांचे सहकारी बरेच पुढे निघून गेले. वाझे हे एकेकाळी मुंबईतले फेमस एऩकाऊंटर स्पेशालिस्ट होते.

एका एऩकाऊंटर स्पेशालिस्टभोवती जे प्रसिध्दीचं वलय असतं ते त्यांच्याभोवती देखील होतं. एऩकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचे ते निकटचे सहकारी होते. पण 2004 मध्ये निलंबनाची कारवाई त्यांच्यावर झाल्याने त्यांना पोलीस दलापासून दूर जावं लागलं होतं.

Sachin Vaze यांनीच स्वत:च्या सोसायटीचे CCTV फुटेज केले डिलीट: NIA सूत्र

2020 मध्ये पोलीस दलात परत आल्यानंतर ते NIA ने अटक करेपर्यंत फक्त एक वर्षाच्या आतच वाझेंनी दिलीप छाबरिया केस, ह्रतिक रोशन केस यासारख्या हाय प्रोफाइल केसेस हाताळल्या.

यातूनच गेली 16 वर्ष जी नामुष्की वाझेंनी सोसावी लागली होती त्यातून असं काही तरी मोठं करुन दाखवावं की पुन्हा प्रसिध्दीच्या झोतात येता येईल अशी वाझेंची इच्छा होती आणि यातून स्वत:च अंबानीच्या घराबाहेर त्यांनी स्कॉर्पिओ ठेवली. CIUचे प्रमुख असल्यामुळे वाझेंकडे या तपासाची जबाबदारी आपसूकच आली आणि ही केस आपण लवकरात लवकर कशी उलगडली हे वाझेंना दाखवायचे होते.

प्रदीप शर्मा, दया नायकांप्रमाणे वाझेंना हवी होती प्रसिद्धी?

1990 च्या दशकात मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डचं अक्षरश: कंबरडं मोडलं होतं. मुंबईतील संघटीत गुन्हेगारी मोडीत काढण्यात मुंबई पोलिसांमधील प्रदीप शर्मा, दया नायक, दिवंगत पोलीस अधिकारी विजय साळसकर यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे या अधिकाऱ्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती.

याच दरम्यान, मीडियाचा चेहरा मोहरा देखील बदलत होता. त्यामुळे हे अधिकारी टीव्हीवर देखील झळकू लागले होते. त्यामुळे त्यांच्याभोवती एक प्रकारचं वलय निर्माण झालं होतं. अशावेळी अनेक पोलीस अधिकाऱ्यांना देखील आपणही अशीच कामगिरी करुन प्रसिद्धी मिळावावी असं वाटत होतं.

या सगळ्यात सचिन वाझे हे नाव देखील अधूनमधून मीडियात पाहायला मिळत होतं. एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी त्यांची देखील ओळख निर्माण झाली होती. थोडीफार प्रसिद्धी त्यांना देखील मिळत होती. त्यामुळे वाझेंना देखील या प्रसिद्धीची काहीशी चटक लागली होती. पण त्यावेळी सचिन वाझे हे प्रदीप शर्मा यांच्या एन्काउंटर टीममधील ते एक सहकारी होते.

यावेळी जेवढी प्रसिद्धी प्रदीप शर्मा आणि दया नायक यांना मिळाली तेवढी सचिन वाझेंना काही मिळू शकली नाही. त्यातच 2004 साली ख्वाजा युनूस प्रकरणी सचिन वाझेंवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाझेंना हवी असलेली प्रसिद्धी काही त्यांना मिळू शकली नाही. म्हणूनच 16 वर्षानंतर पोलीस दलात परतल्यानंतर वाझेंना ‘कुछ तुफानी’ करुन प्रचंड प्रसिद्धी मिळवायची होती का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

NIA नुसार PPE KIT घातलेली ‘ती’ व्यक्ती सचिन वाझेच!

…अद्याप तरी NIA वाझेंवर विश्वास ठेवण्यास तयार नाही!

NIA च्या सूत्रांनुसार वाझेंनी हा सारा प्रकार पोलीस दलात गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी केल्या असल्याचे सांगितले असले तरीसुध्दा NIA यावर विश्वास ठेवायला तयार नाही. या प्रकरणातील साऱ्या शक्यता NIA तपासत आहेत. तेव्हा सत्य काय ते लवकरच समोर येईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT