अभिनेत्री Kaia Gerber चा कान्स रेड कॉर्पेटवरच रोमान्स, बॉयफ्रेंडला किस करताना कॅमेऱ्यात झाली कैद
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अमेरिकन अभिनेत्री काया गेरबर (Kaia gerber) तिचा बॉयफ्रेंड अभिनेता ऑस्टिनसोबत रोमान्स करताना दिसली. अभिनेत्री काया गेरबरने (Kaia gerber) ऑस्टिनला रेड कार्पेटवरच किस करताना बघून उपस्थित बघतच राहिले. मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या काया गेरबरने (Kaia gerber) ऑस्टिनचं सर्वासमोर ओठांचं चुंबन घेतलं. अभिनेता ऑस्टिनची भूमिका असलेल्या एल्व्हिस या चित्रपटाची कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अमेरिकन अभिनेत्री काया गेरबर (Kaia gerber) तिचा बॉयफ्रेंड अभिनेता ऑस्टिनसोबत रोमान्स करताना दिसली.
हे वाचलं का?
अभिनेत्री काया गेरबरने (Kaia gerber) ऑस्टिनला रेड कार्पेटवरच किस करताना बघून उपस्थित बघतच राहिले.
ADVERTISEMENT
मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या काया गेरबरने (Kaia gerber) ऑस्टिनचं सर्वासमोर ओठांचं चुंबन घेतलं. अभिनेता ऑस्टिनची भूमिका असलेल्या एल्व्हिस या चित्रपटाची कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे.
ADVERTISEMENT
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऑस्टिनचा चित्रपट दाखवला जाणार असल्याच्या आनंदात काया गेरबर (Kaia gerber) सर्वांसमोर ऑस्टिनला किस केलं.
२० वर्षीय अभिनेत्री काया गेरबर (Kaia gerber) कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लाल रंगाचा हॉल्टर ड्रेस परिधान करून आली होती. अभिनेता ऑस्टिनच्या हातात हात घालून कायाने कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री केली.
३० वर्षीय अभिनेता ऑस्टिन बटलरचा एल्व्हिस हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार आहे. अभिनेत्री काया गेरबर (Kaia gerber) आणि ऑस्टिन बटलर यापूर्वी २०२१ मध्ये सोबत दिसले होते.
२०२१ मध्ये काया गेरबर आणि ऑस्टिन बटलर सोबत दिसल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर कान्सच्या रेड कार्पेटवरच उपस्थितांच्या गर्दीने त्यांना एकमेकांना किस करताना बघितलं.
लाल रंगाच्या बॅक स्ट्रॅप गाऊनमध्ये काया गेरबर खूपच सुंदर दिसत होती. सुपर मॉडेल Cindy Crawford ची मुलगी असलेल्या कायाने ब्रूनेट बन पद्धतीची केशरचना केली होती.
एल्व्हिस चित्रपटातील भूमिका साकारलेल्या अभिनेता ऑस्टिन बटलरनेही काळ्या रंगाचा डिझायनर सूट घातलेला होता. ऑस्टिन बटलर तरुणांमध्ये लोकप्रिय असून, त्याचे इन्स्टाग्रामवर तब्बल २ मिलियन फॉलोअर्स आहेत.
यापूर्वी २०२२ च्या प्रारंभी काया गेरबर आणि ऑस्टिन बटलर मेट गाला मध्ये एकत्र दिसले होते. मेट गाला कार्यक्रमात कायाने मेटालिक सिल्व्हर गाऊन परिधान केलेला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT