मराठी मालिकांचं शूटींग महाराष्ट्राबाहेर करण्याच्या निर्णयावर अमेय खोपकर नाराज; म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. कोरोनाला रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चैन अंतर्गत कठोर निर्बंध लावले आहेत. यामध्ये शूटींगला देखीलं बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मालिकांचं शूटींग महाराष्ट्राबाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नाराजी व्यक्त केलीये.

ADVERTISEMENT

अनेक मराठी मालिकांनी गोवा, दमण, जयपूर तसंच सिल्वासा अशा विविध राज्यामध्ये चित्रीकरणाला सुरुवात केलीये आहे. मात्र निर्मात्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पडद्यामागे काम करणाऱ्या कामगारांचं फार नुकसान होत असल्याचं अमेय खोपकर यांचं म्हणणं आहे.

यासंदर्भात अमेय खोपकर यांनी ट्विट केलंय. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, हिंदीप्रमाणेच मराठी मालिकांचं चित्रीकरण राज्याबाहेर म्हणजेच गोवा, दमण अशा ठिकाणी सुरु होतंय. निर्मात्यांचा नाईलाज समजू शकतो, पण बरेचसे तंत्रज्ञ तसंच कामगार यांना ‘लहान युनिटचा बहाणा करत’ घरीच बसवून वाऱ्यावर सोडून देण्यात आलंय. रंजक वळणावर असलेल्या मालिकांचा प्रेक्षक दुरावू नये याची काळजी करतानाच आपल्याचं सहकाऱ्यांची उपासमार करतोय याचं भान निर्मात्यांनी ठेवलंच पाहिजे.”

हे वाचलं का?

मनोरंजनाला नो ब्रेक; मराठी मालिकांचं शूटींग महाराष्ट्राबाहेर सुरु

नुकतंच झी मराठी चॅनेलवरील अनेक मराठी मालिकांचं शूटींग महाराष्ट्राबाहेर केलं जातंय. ‘पाहिले ना मी तुला’ आणि ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकांचं चित्रीकरण गोव्यात केलं जात आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ची टीम दमणला गेली आहे. ‘माझा होशील ना’ मालिकेचं शूटींग सिल्वासामध्ये तर ‘चला हवा येऊ द्या’ टीमचा संपूर्ण सेट जयपूरमध्ये उभारण्यात आला असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT