आमिर खानचा सोशल मीडियाला रामराम
कालच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा वाढदिवस होता. तर वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी आमिरने त्याच्या चाहत्यांना एक मोठा धक्का दिला आहे. आमिर खानने सोशल मीडियाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आमिर खानने एक पोस्ट शेअर केली असून सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय चाहत्यांना कळवला आहे. View this post on Instagram A post shared by Aamir Khan […]
ADVERTISEMENT
कालच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा वाढदिवस होता. तर वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी आमिरने त्याच्या चाहत्यांना एक मोठा धक्का दिला आहे. आमिर खानने सोशल मीडियाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आमिर खानने एक पोस्ट शेअर केली असून सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय चाहत्यांना कळवला आहे.
ADVERTISEMENT
अभिनेता आमिर खान त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो, “माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी आभारी आहे. याशिवाय मला तुमच्याशी एक बातमी शेअर करायची आहे, ही माझी सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट आहे. तसंही मी सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय असतो आणि आता मी सोशल मीडिया पूर्णपणे सोडणार असल्याचा निर्णय घेतलाय.”
आमिर खान त्याच्या पोस्टमध्ये पुढे म्हणतो, “मात्र तरीही आपण संवाद साधत राहू. आमिर खान प्रोडक्शनच्या सोशल मीडिया हँडलवर माझ्याविषयी तुम्हाला जाणून घेता येईल. आणि या माध्यमातून पुढेही मी तुमच्या संपर्कात राहणार आहे.”
हे वाचलं का?
दरम्यान आमिर खान सध्या त्याचा आगामी सिनेमा लाल सिंग चड्ढा सिनेमामध्ये व्यस्त आहे. आमिर आणि करिना स्टारर असलेला हा सिनेमा येत्या डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी आमिर खानने एक मोठा निर्णय घेतला होता. लाल सिंह चड्ढा हा त्याचा सिनेमा रिलीज होईपर्यंत आमिरने मोबाईल न वापरण्याचा निर्णय आमिरने जाहीर केला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT