वडिलांकडे हट्ट धरा, वाटल्यास बाळासाहेबांचं नाव द्या, पण ‘ते’ काम पूर्ण करा ! नवनीत राणांचं आदित्य ठाकरेंना पत्र
एरवी शिवसेना नेतृत्वाला धारेवर धरण्यासाठी परिचीत असलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना एक पत्र लिहीलं आहे. नवनीत राणांचं हे पत्र सध्या चांगलंच चर्चेत आहे. चिखलदरा पर्यटन स्थळावर सिंगल केबलवरचा देशातील पहिला स्कायवॉक निर्मितीचं काम हाती घेण्यात आलं होतं, परंतू या कामाला खिळ बसला आहे. नवनीत राणांनी यासाठी आदित्य […]
ADVERTISEMENT
एरवी शिवसेना नेतृत्वाला धारेवर धरण्यासाठी परिचीत असलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना एक पत्र लिहीलं आहे. नवनीत राणांचं हे पत्र सध्या चांगलंच चर्चेत आहे. चिखलदरा पर्यटन स्थळावर सिंगल केबलवरचा देशातील पहिला स्कायवॉक निर्मितीचं काम हाती घेण्यात आलं होतं, परंतू या कामाला खिळ बसला आहे. नवनीत राणांनी यासाठी आदित्य ठाकरेंना साकडं घातलेलं आहे.
ADVERTISEMENT
चिखलदऱ्याला हजारो पर्यटक दरवर्षी येतात आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. या ठिकाणी हातात घेण्यात आलेला सिंगल केबल स्कायवॉकचा प्रकल्प अर्धवट स्थितीत आहे. आदित्यतची आपण राज्याचे पर्यटन मंत्री आहात. मुंबई, ठाणे, कोकणमध्ये पर्यटनाचा विकास करण्यासाठी आपण पुढाकार घेत आहात, तसंच तुम्ही विदर्भाकडेही लक्ष द्या. बाळासाहेब ठाकरेंचं नाव समृद्धी महामार्गाला दिलं आणि तिकडे मोठ्या गतीने महामार्गाचं काम सुरु आहे. हा स्कायवॉक लवकरात लवकर पूर्ण झाल्यास विदर्भाच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. यासाठी वाटल्यास वडिलांकडे हट्ट धरा, स्कायवॉकला शिवसेनाप्रमुखांचं नाव द्या पण ते काम पूर्ण करा”, असं आवाहन नवनीत राणांनी पत्रात केलं आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरु झालेल्या या स्कायवॉकचं काम हे सर्वात आधी पोलीस दलाच्या वायरसलेस यंत्रणेकडून आक्षेप घेत अडवलं गेलं. कित्येक दिवस हे काम बंद होतं, या कचाट्यातून हे काम संपल्यानंतर वनविभागाच्या कचाट्यात अडकलं आहे. सध्या वनखातं हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे हट्ट धरुन हे काम पूर्ण करुन द्या असं नवनीत राणांनी पत्रात नमूद केलंय.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT