Kerala : माहुताच्या मृतदेहाजवळ हत्ती आला आणि… हे पाहून तुमचेही डोळे पाणावतील

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केरळचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. हा व्हीडिओ पाहिल्यानंतर आपल्या प्राणी आणि माणूस यांच्यातलं प्रेम दर्शवणारा आहे. हा व्हीडिओ केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातला आहे. 3 जूनला वयाच्या 74 वर्षी दामोदरन नायर या माणसाचा कर्करोगाने मृत्यू झाला. दामोदरन यांनी एक हत्ती पाळला होता. पल्लत ब्रह्मदत्तन असं या हत्तीचं नाव आहे. दामोदरन हे त्या हत्तीचे माहुत होते. ते आजारी झाले होते, त्यांचं आपल्या हत्तीवर म्हणजेच पल्लत ब्रह्मदत्तनवर खूप प्रेम होतो. त्यांना कर्करोगाचं निदान झाल्याने ते हत्तीजवळ जात नव्हते, त्याच्यापासून अंतर ठेवून राहिले होते.

ADVERTISEMENT

हत्ती आणि माणूस यांच्यातलं प्रेम दर्शवणारा आणि आपल्याला गहिवरून टाकणारा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

ह3 जूनला दामोदरन यांचा मृत्यू झाला. त्यांच्या घरावर शोककळा पसरली. त्यांच्या हत्तीलाही अंतिम दर्शनासाठी आणण्यात आलं. आपल्या माहुताचा मृत्यू झाला आहे हे हत्तीला समजलं तेव्हा हत्ती माहुताच्या अंत्यदर्शनासाठी 20 किलोमीटरचं अंतर चालत आला. माणूस आणि प्राणी यांच्यातल्या प्रेमाचं प्रतीक असलेला हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हीडिओ पाहिल्यानंतर कुणाचेही डोळे पाणावतील.

हे वाचलं का?

या व्हीडिओत आपण पाहू शकतो की माहुताच्या मृतदेहाचं अंत्यदर्शन हत्तीने घेतलं. यावेळी काही लोक हत्तीला घेऊन तिथपर्यंत आले. हत्ती बराचवेळ आपल्या जग सोडून गेलेल्या माहुताकडे पाहात होता. तसंच तो आपल्या सोंडेने माहुताच्या मृतदेहाला स्पर्शही करू पाहात होता. माहुताचा मृत्यू झाल्याचं समजताच त्या हत्तीचेही डोळे पाणावले. पत्रकार नंदगोपाल राजन यांनी हा व्हीडिओ ट्विट केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT