भारतातील घडामोडींचं जागतिक स्तरावरच्या मीडियाने केलेल्या कव्हरेजचं सखोल विश्लेषण
अमोल, पार्थ, मीडिया विश्लेषक सध्याच्या घडीला जगभरातले सगळे देश भारताकडे त्यांचं मार्केट म्हणून पाहतात. कारण भारतात राहणारे बहुसंख्य लोक इंग्रजी बोलतात. इंग्रजी ही जगातल्या अनेक देशांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. त्यामुळेच भारतात घडणाऱ्या घडामोडींबाबत जाणीवपूर्वक असं भाष्य जागतिक स्तरावर केलं जातं की त्याची चर्चा रंगेल आणि त्यानंतर भारताच्या अंतर्गत राजकारणात त्याचा परिणाम जाणवू शकेल. उदाहरणच […]
ADVERTISEMENT
अमोल, पार्थ, मीडिया विश्लेषक
ADVERTISEMENT
सध्याच्या घडीला जगभरातले सगळे देश भारताकडे त्यांचं मार्केट म्हणून पाहतात. कारण भारतात राहणारे बहुसंख्य लोक इंग्रजी बोलतात. इंग्रजी ही जगातल्या अनेक देशांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. त्यामुळेच भारतात घडणाऱ्या घडामोडींबाबत जाणीवपूर्वक असं भाष्य जागतिक स्तरावर केलं जातं की त्याची चर्चा रंगेल आणि त्यानंतर भारताच्या अंतर्गत राजकारणात त्याचा परिणाम जाणवू शकेल.
उदाहरणच द्यायचं झालं तर न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलेल्या व्यंगचित्राचं देता येईल. या व्यंगचित्रातून भारतातील अंतराळ मोहिमांची खिल्ली उडवण्यात आली होती. भारतीय संशोधकांना पशूप्रमाणे दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर न्यूयॉर्क टाइम्सने दिलगिरीही व्यक्त केली मात्र जी बदनामी व्हायची होती ती झालीच. भारतातल्या कोरोना लाटांच्या बाबतीतही जागतिक स्तरावर असंच काहीसं गडद चित्र रंगवलं गेलं.
हे वाचलं का?
कोरोनाच्या बातम्या कव्हर करत असताना जागतिक स्तरावरच्या अनेक नामांकित वृत्तपत्रांनी भारतात झालेल्या सामूहिक मृत्यूंच्या चितांचे फोटो पहिल्या पानावर छापले. भारतात कोरोनाची दाहकता किती जास्त आहे आणि आरोग्य व्यवस्था कशी अपयशी ठरते आहे हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. मात्र न्यूयॉर्क किंवा लंडन येथील एकाही वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर तिथे कोरोनामुळे झालेल्या मृत्यू आणि सामूहिक दफनविधीचे फोटो छापले गेले नाहीत. भारतात चिता कशा जळत आहेत ते दाखवलं गेलं मात्र स्वतःच्या देशांमधलं वास्तव यांनी लपवून ठेवलं. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हेच धोरण यामागे होतं हे उघड आहे.
ADVERTISEMENT
भारताच्या बाबतीत जगाने जे कव्हरेज केलं त्यात जागतिक मीडिया हाऊससचे पक्षपात, दांभिकता, पूर्वग्रह, वंशवाद, वर्गवाद, अंतर्मुख करणारे दृष्टीकोन हे सगळं गडदपणे दिसून आलं. मागील दोन वर्षांच्या कालावधीत या कव्हरेजची वाचकसंख्या त्यांच्या देशाच्या तुलनेत भारतात जास्त वाढली हेच चित्र दिसून येतं.
ADVERTISEMENT
मार्च 2019 ते मार्च 2021 या कालावधीसाठी भारतातील त्यांची मासिक वाढ देखील मोजली गेली, ज्यामध्ये असे आढळून आले की अभ्यासाधीन असलेल्या सर्व परदेशी मीडिया आउटलेट्सने त्यांच्या वाचकसंख्येत अचानक वाढ केली आहे जेव्हा जेव्हा भारतात निषेध होतो. असे दिसून येते की ते अशा संधींचा आक्रमक वार्तांकन करून फायदा घेतात हे दिसून आलं आहे. भारत अपयशी देश आहे. भारतात टोकाचं राजकारण चालतं हे दाखवण्याचा प्रयत्न अशा प्रकारच्या वार्तांकनातून केला जातो.
वाचकसंख्येचा ही सगळी माहिती फक्त या संख्येचा अभ्यास करणारी कंपनी ComScore कडून प्राप्त करण्यात आला आहे. भारतातील राजकीय किंवा सामाजिक घडामोडींच्या कव्हरेजमध्ये क्लिक बीट हे डिजिटल मीडियात सूचक मानलं जातं. ज्याद्वारे अधिकाधिक वाचक आणि त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न होतो. प्रत्यक्षात बातमी तशी नसते पण ती सांगण्याची किंवा त्याला मथळा देण्याची शैली अशी असते की त्यामुळे वाचकसंख्या वाढते. आहे ते चित्र रंगवून- मीठ-मसाला लावून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. जागतिक स्तरावर हे दिसून आलं आहे त्यामुळेच त्यांच्या वाचक संख्येत वाढ झाली आहे हे दिसलं आहे.
विविध अहवाल आणि अभ्यास यांचा संदर्भ लक्षात घेतला तर त्यात हे ठळकपणे दिसून येतं की पाश्चात्य देश हे भारतात घडणाऱ्या घडामोडींचं कव्हरेज नकारात्मकरित्या रंगवून ते मार्केटमध्ये विकतात. माणसाचा स्वभाव हा अनेकदा निराशावादी असू शकतो त्याला खतपाणी घालण्याचं काम ही माध्यमं करू शकतात. त्यानुसार आपला व्यवसाय वाढवण्याचं टार्गेटही त्यांच्यासमोर असतं. कोव्हिडच्या बाबतीत देण्यात येणाऱ्या कीवर्ड्स उदाहरण पाहा…
Key Words: Western Media, Covid pandemic, Sensationalism, Editorial Bias, Digital Growth, Click bait journalism, Negative News, Covid Vaccines
16 जून 2021 ला अमेरिकन माध्यमातला लाडका पत्रकार रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यासोबत जिनिव्हा शिखर परिषदेला उपस्थित होते. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही पत्रकारांना त्यांच्या नकारात्मकतेवरून विचारलं. त्यावेळी ते म्हणाले की चांगला रिपोर्ट हवा असेल तर नकारात्मकता आवश्यक असते. तुम्हाला नकारात्मक गोष्टी दिसल्या पाहिजेत. तर तुमची बातमी चांगली होते.
नकारात्मकता तयार करायची आणि आपली बातमी पुढे रेटायची, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवायची ही पद्धत सुमारे पन्नास वर्षांपासून सुरू आहे. आता ते प्रमाण चांगलंच वाढलं आहे हे पत्रकारितेत ठळकपणे दिसून येतं. सनसनाटी निर्माण करून नकारात्मकता पसरवायची हा उद्देश ठळकपणे अधोरेखित होतो.
नॉर्वेजियन प्रोफेसर जोहान यांनी त्यांच्या अभ्यासात असं म्हटलं आहे की विरोधी वार्तांकन करणं हे चांगल्या पत्रकारितेचं वैशिष्ट्य आहे.
कोव्हिड 19 या महामारीच्या बातम्यांचं कव्हरेज करत असताना एक प्रकारची नकारात्मकता होती. जगावर महामारी येणं ही एक शोकांतिका आहे अशात लोकांना चांगल्या बातम्या देण्याऐवजी वाईट बातम्या देण्यात आल्या असंही निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. याचं एक उत्तम उदाहरण हे सांगता येईल की जेव्हा कोरोनाचे रूग्ण वाढत होते तेव्हा रूग्णवाढ कशी आटोक्याबाहेर चालली आहे? आरोग्य व्यवस्था कशी कमकुवत ठरते आहे? जगात कसं सगळं कोलमडून पडलं आहे? या विषयावरच्या बातम्यांना प्राधान्य देण्यात आलं. मात्र त्या तुलनेत लस निर्मितीच्या बातम्या फार प्रमाणात दिसल्या नाहीत. त्या छापल्या गेल्याच नाहीत असं नाही मात्र त्यांना नकारात्मक बातम्यांच्या तुलनेत कमी महत्व दिलं गेलं हे ठळकपणे दिसलं. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या या भारतातही अशाच प्रकारे देण्यात आला हेच अनेक अहवाल सांगतात.
भारतातल्या मुद्द्यांची ढोबळमानाने चर्चा करायची झाल्यास मुस्लिम समाजावर होणारा अन्याय, शेतकरी, मोदी सरकार, गाय वाचवा मोहीम, हिंदू, हिंसाचार, पोलीस, लॉकडाऊन, कोरोना हे सगळे विषय नकारात्मक बातम्या देऊन रंगवले गेले. या सगळ्यामध्ये द न्यू यॉर्क टाइम्स, द वॉल स्ट्रिट जरनल, द वॉशिंग्टन पोस्ट, द गार्डियन, टाइम या सगळ्यांनीच वापर केला. या विषयांवरच्या बातम्या अशा पद्धतीने छापल्या की नकारात्मकता पसरू लागेल आणि वाढीला लागेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT